Download App

ओठांना लिपस्टिक अन् हातात बांगड्या; पोलीसही हैराण, आत्महत्येपूर्वी अधिकारी का बनला महिला?

उत्तराखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका अधिकाऱ्याने महिलेचा पोषाख परिधान करून आत्महत्या केली आहे.

  • Written By: Last Updated:

Woman Dressing Officer Suicide : उत्तराखंडच्या पंतनगरमध्ये एक हैराण करणारं प्रकरण समोर आलंय. येथील एअरपोर्ट एअर ट्रॅफिक कंट्रोल टीममध्ये कार्यरत असलेल्या असिस्टेंट मॅनेजरने आत्महत्या केलीय. (Officer Suicide) आशीष चौंसाली असं आत्महत्या केलेल्या मॅनेजरचं नाव आहे. ( Suicide) दरम्यान, त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्तवितर्क लावले जात आहे. कारण त्याने आत्महत्येवेळी महिलेचा पोषाख परिधान केला होता.

पोलीस विभागही कोड्यात Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

आशिष चौंसाली याने आत्महत्या केल्याचं कळताच त्यांच्या कुटुंबात एकच शांतता निर्माण झाली आहे. पूर्ण कुटुंबच एका धक्क्यात गेलं आहे. दरम्यान, आशिष यांनी महिलेचा पेहराव आणि मेकअप का केला असावा असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. पोलीस विभागही त्यांच्या या कृत्यामुळे चांगलाच कोड्यात पडला आहे. सध्या पोलीस विभाग या प्रकरणाचा सेक्शुअल डिसऑर्डर, ब्लॅकमेलिंग आणि ऑनलाईन फ्रॉड अशा सर्व अनुषंगाने तपास करत आहेत.

महिलेच्या पेहरावात दिसला

कुटुंबियांनी सांगितल्यानुसार, आशिष यांच संपूर्ण वर्तन दररोजच्यासारखच होतं. त्यामध्ये काही बदल झालेला दिसला नाही. त्यामुळे कुठली शंकाही आली आहे. ते रात्री दहा वाजेच्या सुमारास झोपायला गेले. पण, सकाळी त्यांनी दरवाजा उघडला नाही. आशिष यांचा भाच्चा आकाश हा दरवाजा ठोठावत राहिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा आतलं दृश्य पाहताच सर्वांनाच धक्का बसला. महिलेच्या पेहरावात आशिष यानी आत्महत्या केल्याचं उघड झालं.

महिलेचे कपडे आणि मेकअपचे सामान

या घटनेनंतर आता आशिष याला डिसऑर्डरचा प्रॉब्लेम होता का? असा प्रश्न विचारला जात आहे. आशिष यानी काही दिवसांपूर्वीच हल्द्वानीच्या देवलचौड येथे घर खरेदी केलं होतं. नुकताच त्याचा मित्र भरत त्याच्या घराजवळ राहण्यासाठी आला होता. आशिष यानेच भरतला नोकरी लावली होती. पण, भरतने देखील आशिषला अशा अवस्थेमध्ये कधी पाहिलं नव्हतं. आशिषला महिलेचे कपडे आणि मेकअपचे सामान कोणी आणून दिलं? यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? असाही तपास सध्या सुरू आहे.

आत्महत्येचं नक्की कारण काय? आष्टीकरांना पुन्हा का घ्यावी लागली शपथ? महाराष्ट्रातल्या खासदारांकडून घोषणा, अध्यक्षांनी दिली समज

आशिष याचा भाचा आकाश त्यांच्यासोबतच दोन वर्षांपासून राहत होता. त्यांनीच त्याला बँकेत नोकरी लावून दिली होती. पण, आकाशला देखील यापूर्वी आशिष यांच्याबाबत काही वेगळं आढळलं नाही. त्यामुळे पोलिसांसाठी हे प्रकरण खुपच गुंतागुंतीच झालं आहे. आशिष यानी सुसाईड नोट देखील लिहिली नाही. त्यामुळे त्यानी आत्महत्या का केली याचं कारण समजू शकत नाहीये. पोलीस आशिष याचा फोन कॉल, मेसेज याचा तपास करत आहेत. याप्रकरणाच्या तपासासाठी एक टीम स्थापन केले जाण्याची शक्यता आहे.

follow us