ब्रेकिंग! उत्तराखंडात मोठी दुर्घटना, तब्बल 57 मजूर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले

ब्रेकिंग! उत्तराखंडात मोठी दुर्घटना, तब्बल 57 मजूर बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले

Uttarakhand News : उत्तराखंड राज्यातील चमोली येथे मोठी (Uttarakhand News) दुर्घटना घडली आहे. येथील मीणा गावात ग्लेशियर तुटून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल 57 मजून बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून या भागात बर्फ कोसळत आहे. याच दरम्यान महामार्गावर काम करणारे 57 मजूर या बर्फाखाली अडकले आहेत. यातील काही मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बीआरओ आणि जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

घटना घडली त्यावेळी खासगी ठेकेदाराचे मजूर या ठिकाणी काम करत होते. सर्वजण बीआरओच्या कंत्राटाअंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदाराचे मजूर होते. याच वेळी बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन झाले. यामुळे मजूर वाट दिसेल तिकडे पळू लागले. यातील काही जणांना वाचवण्यात आले मात्र 57 मजूर या बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातील 10 मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. आणखी 47 मजुरांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

Uttarakhand Rain : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात 4 मजुरांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू

दरम्यान, या घटनेची अधिक माहिती देताना बीआरओ मॅनेजरने सांगितले की मजुरांच्या कॅम्पजवळ हिमस्खलन झाले. यामुळे ही घटना घडली. या ढिगाऱ्याखाली नेमके किती मजूर दबले गेले आहेत याचा निश्चित आकडा अजून मिळालेला नाही. या घटनेनंतर चमोलीत सेना आणि आयटीबीपीने मदतकार्याला सुरुवात केली आहे. हनुमान चट्टीपासून पुढे महामार्ग बंद करण्यात आला आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके रवाना झाली आहेत.

उत्तराखंड राज्यातील डोंगराळ भागात हवामान खराब आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या प्रवाहात अनेक वाहने वाहून गेली आहेत. मुसळधार पावसाने हिमाचल प्रदेशात (Heavy Rain in Himachal Pradesh) भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात या पावसाने हाहाकार उडाला आहे. मंडी जिल्ह्यातील ओट भागात लँडस्लाइड झाल्याने चमोली -मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. कुल्लूतही सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यात अनेक वाहने वाहून गेली आहेत.

मोठी बातमी! उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता कायदा लागू, होणार ‘हे’ बदल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube