Download App

HMPV व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत WHO ची मोठी अपडेट; जाणून घ्या एका क्लिकवर

World Health Organization On HMPV Virus In China : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये HMPV च्या रूग्णांची (HMPV Virus) नोंद झाली आहे. या विषाणूचा विशेषतः लहान मुलांवर परिणाम होतोय. आत्तापर्यंत अनेक लोक या आजाराला बळी पडली आहेत. तेव्हापासून नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे. या सगळ्या दरम्यान चीनमध्ये पसरलेल्या व्हायरसवर जागतिक आरोग्य संघटनेची (World Health Organization) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

चीनमध्ये HMPV नावाच्या नव्या विषाणूचा फैलाव होतोय. या व्हायरसची चीनमध्ये अनेक नागरिकांना लागण झालीय, तसेच भारतात सुद्धा या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आलेत. यासंदर्भात भारत सरकार देखील अलर्ट मोडवर (HMPV Virus Update) आहे. यासंदर्भात देशाचे आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी HMPV व्हायरसमुळे घाबरून जावू नका, असं आवाहन नागरिकांना केलंय.

काँग्रेसला धक्का! दिल्लीत उद्धव ठाकरेंचा ‘आप’ला पाठिंबा; इंडिया आघाडीला तडे?

तसेच एचएमपीव्ही हा विषाणू कोरोना एवढा घातक नसल्याचं काही आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगत आहेत. मात्र, आता या एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसच्या प्रादुर्भावासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) महत्वाची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेले वेगवेगळे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच चीनमधील आरोग्य सेवा प्रणालीवर या व्हायरसचा कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कोणतीही आपत्कालीन घोषणा केली गेलेली नाही, असं डब्ल्यूएचओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

Dhanashree Verma : घटस्फोटाच्या चर्चा, धनश्रीने ट्रोलर्सना फटकारलं, म्हणाली, “माझं मौन हे..”

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील आरोग्य सेवा प्रणालीवर कोणताही दबाव नाही. तसेच, कोणतीही आणीबाणी जाहीर केलेली नाही. निवेदनात म्हटलंय की, WHO जागतिक, प्रादेशिक आणि देश पातळीवर सहाय्यक प्रणालींद्वारे श्वसन रोगांचे निरीक्षण करत आहे. आवश्यकतेनुसार अद्यतने प्रदान करत आहे. चीनने HMPV संदर्भात 29 डिसेंबर 2024 पर्यंतची आकडेवारी जाहीर केलीय. त्या आधारावर, अलिकडच्या आठवड्यात तीव्र श्वसन संसर्गामध्ये वाढ झालीय.

व्हायरसवरील अलीकडील अहवालात असं म्हटलंय की, एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो अनेक देशांमध्ये हिवाळ्यापासून वसंत ऋतुपर्यंत पसरतो, जरी सर्व देश नियमितपणे एचएमपीव्ही ट्रेंडची चाचणी आणि डेटा प्रकाशित करत नसले, तरीही काही प्रकरणांमध्ये ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनियासह हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असू शकते. HMPV ची लागण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये सामान्य सर्दीसारखीच सौम्य लक्षणे असतात. काही दिवसांनी बरे होतात.

 

follow us