Download App

Sanjay Raut : अस्वस्थ वाटत असेल तर राजीनामा द्या! राऊतांचे भुजबळांना आव्हान

Sanjay Raut Criticized Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक (Chhagan Bhujbal) झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र दुसरीकडे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात असून आता भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी काल भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय राऊत आज नगरमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे छगन भुजबळ अस्वस्थ झाले आहेत का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, भुजबळांना या निर्णयाबाबत अस्वस्थता वाटत असले तर त्यांनी राजीनामा देऊन टाकावा. तसेच शासनाने मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहे असे जनमत निर्माण झाले आहे. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची भूमिका आहे. कोणताही समाज असो प्रत्येकाचे समाधान होईल असा निर्णय घेण्यात यावा. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रकारे काळ गुलाल उधळला त्यावरून दुसरा समाज अस्वस्थ आहे असे वाटू लागले आहे.

Manoj Jarange : मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? यादीच आली समोर..

ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना जर या निर्णयावर अस्वस्था वाटत असले तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. या सरकारमधील नेत्यांमध्ये भिन्नता आहे. त्यांच्या मंत्र्यांची वेगवेगळी मत पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री जे बोलतात ती सरकारची भूमिका आहे असे समजले जाते. मात्र सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी सरकारमधील काही नेते इतर भूमिका देखील जाहीर करत आहे याचाच अर्थ यांच्यामध्ये एकवाक्यता नाही आहे असा टोला राऊत यांनी लगावला.

ठाकरे गटाचा महामेळावा नगर शहरात पार पडणार आहे. या मेळाव्याला आमदार तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याद्वारे संजय राऊत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे. या मेळाव्यासाठी संजय राऊत नगरमध्ये आले आहेत.

Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार; पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला

नितीश कुमारांचे मानसिक संतुलन बिघडले

विरोधकांनी इंडिया आघाडी (INDIA Alliance) तयार केली आहे. मात्र निवडणुकांपूर्वीच या आघाडीला धक्का लागला आहे. नितीशकुमार यांनी (Nitish Kumar) राजीनामा देत या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावर खासदार राऊत म्हणाले नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. आम्ही त्यांना चांगले ओळखतो. नितीश कुमार हे आजारी आहेत ते आमच्यापासून बाजूला गेल्याने बिहारच्या राजकारणावर  (Bihar Politics) काही फरक पडणार नाही. बिहारमध्ये तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) व इतर पक्ष यांची आघाडी मजबूत आहे. तसेच दिल्लीमध्ये काँग्रेस व आम आदमी पार्टी यांचे गठबंधन झाले असून ते लवकरच जाहीर होईल.

follow us