Download App

Lok Sabha 2024 : ‘राष्ट्रवादीने नगर दक्षिण सोडल्यास आम्ही तयार’; राऊतांचं दबावाचं पॉलिटक्स!

Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये येत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर थेट दावाच ठोकला आहे. शिवसेना महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहे. नगरमधील शिर्डी लोकसभा तर आम्ही नक्कीच लढवणार आहोत पण जर नगर दक्षिण जागा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आम्हाला लढवण्यास दिली तर ही जागा देखील आम्ही नक्की लढवू, असे राऊत स्पष्ट म्हणाले. संजय राऊत आज नगरमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नगर शहरात आज ठाकरे गटाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे शक्तिप्रदर्शनही केले जात आहे. या मेळाव्यात संजय राऊत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नगर दक्षिणेची जागा लढविण्यास शिवसेना इच्छुक असल्याचे स्पष्ट केले.

Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखानाचं?’ राऊतांचा संतप्त सवाल

राऊत पुढे म्हणाले, शिवसेना महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा तर आम्ही नक्कीच लढवणार आहोत पण जर नगर दक्षिण जागा राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला लढवण्यास दिली तर ही जागा देखील आम्ही नक्की लढवू. आमच्याकडे 48 मतदारसंघांसाठी चांगले उमेदवार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिकीट वाटपाचे पूर्णपणे फायनल झाले आहे.

आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी मजबूत असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकरांबाबत (Prakash Ambedkar) देखील आम्ही सकारात्मक आहोत. एकमेकांची जिरवायची की भाजपाला (BJP) हरवायचे हे आपण आधी ठरवले पाहिजे. आम्ही वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे. येणाऱ्या 30 तारखेला होणाऱ्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Lok Sabha 2024 : ‘पळू नका, माझ्याविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवा’ नाथाभाऊंचं महाजनांना चॅलेंज

रामाच्या नावावर नाही तर कामावर मत मागा

देशात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना (Ram Mandir) झाली. भाजपकडून मात्र याचा वापर निवडणुकांसाठी केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, राज्यातील सामाजिक स्थिती बिघडवण्याचे काम सुरू असून त्यावर निवडणुका (Elections 2024) लढवल्या जाणार असतील तर हे चुकीचे आहे. मत तुम्ही केलेल्या कामावर मागा रामाच्या नावावर नको, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

follow us

वेब स्टोरीज