Sanjay Raut : ’10 वेळा पक्ष बदलणाऱ्यांना पक्षाचा आत्मा काय माहित?’ राऊतांचा नार्वेकरांना खोचक सवाल
Sanjay Raut Criticized Rahul Narvekar : अयोध्येत काल प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या (Ram Mandir Pran Pratishtha) उत्साहात पार पडला. त्यानंतर आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा आणि महाआरती केली. त्यानंतर आज अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना डिवचले आहे. नार्वेकरांनी आतापर्यंत 10 वेळा पक्ष बदललेत. त्यांना काय माहित पक्षाचा आत्मा काय असतो?, असा खोचक सवाल राऊत यांनी केला आहे.
अधिवेशनाआधी राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार अपात्रता प्रकरण, आगामी निवडणुका या सर्वच मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे सांगितले. नार्वेकरांवरही त्यांनी खोचक टीका केली. नार्वेकर म्हणाले म्हणून काही गट होत नाही. 10 ते 12 लोक फुटले आहेत. तो गट आहे. त्या गटाला कुणीतरी खोके घेऊन टिळा लावला असेल. लोक गटाच्या नाही तर विचारांच्या मागे जात असतात. राहुल नार्वेकर, निवडणूक आयोगाचे डोमकावळे यांनी काल नाशिकध्ये येऊन शिवसेना काय ते पहायला पाहिजे होते. शिवसेवा कागदावर नाही तर रस्त्यावर आहे, असे राऊत म्हणाले.
Sanjay Raut : ..तर भाजपला प्रभू श्रीरामही वाचवू शकणार नाहीत; राऊतांचा हल्लाबोल
प्रत्यक्ष अधिवेशन 23 तारीखला सुरू होईल. 3 तारखेला डेमोक्रसी क्लब येथे अनेक राजकीय ठराव केले जातील. राज्यभरातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि शिवसेनेच्या वाटचालीची पुढील दिशा ठरवली जाईल. अधिवेशनंतर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होईल. 22 आणि 23 तारखेला शिवसेना महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.