Download App

भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच; छगन भुजबळांनी क्लिअर सांगितलं…

भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेत छगन भुजबळ यांनी केलायं.

Chagan Bhujbal News : भाजपकडे (BJP) 132 जागा आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी केलायं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असल्याचं चित्र आहे. निकाल लागल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. त्यावर बोलतानाच भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. ते नाशिकमध्ये बोलत होते.

थंडी गायब, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

छगन भुजबळ म्हणाले, महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा झाली आहे. खातेवाटबाबत काहीही पेच नसून गृहमंत्रीपदावरुन काहीही अडलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह व्यस्त असल्यामुळे थोडा वेळ पुढे गेला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की चर्चेतून मार्ग काढू, मात्र, राज्यात भाजपकडे 132 जागा असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं छगन भुजबळांनी सांगितलंय.

तसेच गृहखातें जेवढं चांगलं आहे तितकेच अडचणीचं देखील आहे. राज्यात कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो त्याचे प्रश्न देखील गृहमंत्र्याला विचारले जातात. मी गृहमंत्री असताना तर गॅंगवॉर सुरू होता, त्याकाळी मुंबईत लग्न देखील त्यावेळी कोणी करत नव्हते, गृहमंत्रिपद म्हणजे काही सोपं काम नाही, असं छगन भुजबळांनी म्हटलंय.

गुलाबरावांनी गुलाबरावसारखे राहावे, जुलाबराव होऊ नये, अजितदादा नसते तर…; मिटकरींचा टोला

यावेळी बोलताना भुजबळ यांनी संजय राऊतांच्या विधानांवर बोलणं टाळलंय. तर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं नसतं तर पुढील घटना घडल्या असं तेच बोलले होते. कोणीतही सोईचं बोलण्यात काहीही अर्थ नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय.

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; दरेगावात काय घडतंय? शिंदे मुंबईत कधी परतणार?

शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या विधानावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिलीयं. ते आमच्यासोबत नसते तर आज आमच्या 100 जागा निवडून आल्या असत्या, महायुतीत तिन्ही पक्षांनी मिळून जे निर्णय घेतले आहेत, त्याचं फलित मिळालं असल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.


काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?

महायुतीत अजित पवार आमच्यामध्ये नसते तर आमच्या ९० ते १०० जागा निवडून आल्या असत्या”, असा दावा शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा माजी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

follow us