भाजपचं ठरलं! मुख्यमंत्रि‍पदाचा शपथविधी 5 डिसेंबरला, एकनाथ शिंदेंना सूचक इशारा?

भाजपचं ठरलं! मुख्यमंत्रि‍पदाचा शपथविधी 5 डिसेंबरला, एकनाथ शिंदेंना सूचक इशारा?

Maharashtra CM Oath Ceremony of mahayuti : राज्यातील जनतेची प्रतिक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाचा (Maharashtra CM) शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचं समोर आलंय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले होते, तरी देखील मुख्यमंत्रि‍पदाबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. दरम्यान (mahayuti) भाजपा (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केलीय. यामधून एकनाश शिंदे यांना सूचक इशारा दिला गेलाय, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महायुती सरकारच्या शपथविधीची अखेर मुहूर्त ठरला आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. 5 डिसेंबर रोजी महायुतीचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. आता शपथविधीची तारीख ठरलीय, पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत मात्र कोणतीच माहिती समोर आलेली नाही. परंतु शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांसह देशातील भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचं देखील समोर आलंय.

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; दरेगावात काय घडतंय? शिंदे मुंबईत कधी परतणार?

दिल्लीत मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर गृहमंत्रिपदासोबत महत्त्वाची खाती देण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यासोबतच विधानपरिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली होती. परंतु आता भाजपने थेट शपथविधीची तारीखच जाहीर केली अन् एकनाथ शिंदे यांना थेट सूचक इशाराच दिलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चंद्रशेखर बावनकुळे राज्यपाल आहेत का? संजय राऊतांचा हल्लाबोल, शपथविधीची तारीख…

दरम्यान एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून त्यांच्या दरे गावी गेले होते. आज दुपारी दोन वाजता एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हेलिकॉप्टरने दरे गावातून निघणार आहेत. त्यानंतर ते ठाण्यात येणार आहेत. एकनाथ शिंदे ठाण्यात आल्यानंतर आराम करणार की भेटीगाठी घेणार? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज संध्याकाळी महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे आज मुंबईत येत असल्याची चर्चा सुरू आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube