Download App

पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यातही मोठा धमाका, अजितदादा गटाचे दीपक मानकरही शरद पवारांच्या गळाला?

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर हे देखील शरद पवार गटात जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

  • Written By: Last Updated:

Deepak Mankar : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोडांवर अजित पवारांना (Ajit Pawar) पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह (Ajit Gavhane) सुमारे 24 पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. अशातच आता अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) हे देखील शरद पवार (Sharad Pawar) गटात जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

IAS पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच मांडली सविस्तर भूमिका… वाचा मसुरीला जाण्यापूर्वीचा खुलासा 

बंडखोरीनंतर दीपक मानकर हे अजित पवारांसोबत राहिले. पुण्यात शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाला आव्हान देत राहिले. बंडखोरीनंतर मानकर यांनी काही नगरसेवकांना अजितदादांकडे ओढून आणले आणि पक्षात आपले महत्त्व वाढवले. मात्र, महापौर राहिलेल्या मानकरांचं लक्ष आता शिवाजीनगर मतदारसंघावर आहे. या मतदारसंघातून त्यांनी विधानसभा लढवावी, अशी त्यांच्या समर्थकांचीही इच्छा आहे.

भाजपची मते आम्हाला मिळत नाहीत…; DCM अजित पवारांचा दावा तरी काय? 

मानकर यांचा शिवाजीनगर मतदारसंघावर डोळा असला तरी ही जागा सध्या भाजपकडे आहे. त्यामुळं आमदारकीसाठी जोरदार प्रयत्न करणारे मानकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता नाकरता येत नाही. शरद पवार गटाकडूनही त्यांना पक्षात आणण्यासाठी जोददार प्रयत्न सुरू आहेत.

मानकर काय म्हणाले?

दीपक मानकर यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याची चर्चा फेटाळून लावली. मी अजितदादांशी प्रामाणिक असून इतर कोणत्याही पक्षात जाण्यात मला रस नाही. पुण्यात आमच्या पक्षाचे संघटन मजबूत असून पंधराशे ते सोळाशे ​​पदाधिकारी जोमाने काम करत आहेत. यातील एकही पदाधिकारी पक्ष सोडणार नाही. याउलट 14 नगरसेवक आपल्या संपर्कात असून त्यांना भविष्यात दादांशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मानकर म्हणाले.

दरम्यान, मानकर हे अजित पवारांसोबतच थांबणार की, शरद पवार गटात जाणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us