Download App

Maharashtra Politics: अजितदादा दिल्लीला, देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशात, मुख्यमंत्री कुठे?

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

मुंबईः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आजारपणातून बरे झाल्यानंतर काका शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटले आहेत. त्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. शुक्रवारी फडणवीस यांनी बऱ्हानपूर येथील सभाही गाजविली आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याबाहेर गेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यात गेल्या काही दिवसांपासून तिन्ही नेते एकत्रित दिसलेले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत.

Pune News : पवार फॅमिली एकत्र? सुप्रिया सुळेंनी सांगितलं खरं कारण..,

गेल्या पंधरा दिवसांपासून अजित पवार हे डेंग्युने आजारी होते. डॉक्टरांच्या सल्याने उपचार आणि सक्तीची विश्रांती त्यांनी घेतली आहे. एक दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी फेसबुक पोस्ट टाकली होती. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजाने दूर राहावे लागत आहे हे त्रासदायक असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. पोस्टनंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार हे काका प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी गेले होते. तेथे शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याबरोबर इतर घरातील व्यक्तींना भेटले. त्यानंतर अजित पवार हे थेट दिल्लीला खासगी विमानाने दाखल झाले.

Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ नका’; ‘OBC मधून आरक्षण शक्य नाही’ म्हणणाऱ्यांना जरांगेंनी सुनावलं

शरद पवार यांना भेटून अजित पवार हे थेट दिल्लीला गेल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांनी दिल्लीत भाजपचे चाणक्य व गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. ही भेट नेमकी कशासाठी आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी व्यस्त आहेत. ते मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक आहेत. शुक्रवारी ते बऱ्हानपूर येथे प्रचारात व्यस्त होते. बऱ्हानपूर येथील सभाही फडणवीसांनी जोरदार गाजविली आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज्यात नव्हते. दुपारी शिंदे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर ते कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे असल्याचे समोर आले. भक्तिभावाने दर्शन घेत अभिषेक केला. बालाजी चरणी नतमस्तक होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचे मागणे देवाकडे मागितले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हेही कुटुंबासह बालाजीच्या दर्शनाला गेले होते. तेही मुख्यमंत्र्यांना भेटले. तसा फोटो महाडिक यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज