राज्यातील कौटुंबिक राजकारणाचं अहिल्यानगरमध्ये प्रतिबिंब; महापालिकेत रंगणार काका विरुद्ध पुतणी अशी लढत!

अहिल्यानगर महापालिका निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा आरसा.

  • Written By: Published:
WhatsApp Image 2026 01 05 At 7.26.42 PM

 BJP’s Datta Gadalkar and Shiv Sena’s Suvarna Jadhav : राज्यभरात सध्या महापालिका निवडणुकांची राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक पक्ष विकास, स्थानिक प्रश्न आणि नेतृत्वाच्या जोरावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वातावरणात अहिल्यानगर महापालिका निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा आरसाच ठरत असल्याचं चित्र आहे. राज्यात जरी भाजप आणि शिवसेना एकत्र महापालिका निवडणुका लढवत असल्याचं जाहीर झालं असलं, तरी अहिल्यानगरमध्ये(Ahilyanagar) मात्र हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

शिवसेना स्वबळावर लढत असताना भाजपने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील प्रत्येक प्रभागात चुरस वाढताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी नातेसंबंधात लढती पाहायला मिळत असून अशीच काहीशी परिस्थिती अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत देखील आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 हा विशेष चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या प्रभागात थेट नात्यातील राजकीय संघर्ष रंगणार आहे. विद्यमान शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा जाधव(Suvarna Jadhav) यांच्यासमोर भाजपचे उमेदवार दत्ता गाडळकर(Datta Gadalkar) यांचं आव्हान आहे. सुवर्णा जाधव या दत्ता गाडळकर यांच्या पुतणी असल्याने ही लढत केवळ राजकीय न राहता कौटुंबिक आणि भावनिक पातळीवरही चर्चेचा विषय बनली आहे.

शरद पवारांची खासदारकी धोक्यात; राज्यसभेत राजकीय हालचालींना वेग; खासदार ओवेसींच्या दाव्याने खळबळ

सुवर्णा जाधव या मागील नगरसेवक पदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून दुसरीकडे भाजपचे उमेदवार दत्ता गाडळकर हे अनुभवी आणि अभ्यासू उमेदवार मानले जातात. या प्रभागात पद नसतानाही त्यांची अनेक विकासकामे असल्याने मागील निवडणुकीत याच प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांच्याविरोधात त्यांना अत्यंत कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाची सल आजही त्यांच्या समर्थकांमध्ये असल्याचं चित्र असून, यावेळी कोणतीही चूक नको, या निर्धाराने गाडळकर प्रचारात उतरले आहेत. भाजप-राष्ट्रवादी युतीचा आधार, संघटनात्मक ताकद आणि केंद्र-राज्य सरकारमधील सत्तेचा प्रभाव हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत.

या प्रभागात सध्या प्रचाराचा जोर वाढला असून घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. कुटुंबातील दोन उमेदवार समोरासमोर असल्याने मतदारही संभ्रमात असल्याचं चित्र आहे. काही मतदार नातेसंबंधांपेक्षा विकासाला प्राधान्य देणार असल्याचं सांगत आहेत, तर काहीजण उमेदवाराच्या व्यक्तिगत संपर्कावर आणि विश्वासावर मत देण्याच्या भूमिकेत आहेत. या लढतीत महिला विरुद्ध अनुभवी पुरुष, विद्यमान सत्ताधारी विरुद्ध आव्हान देणारा, आणि शिवसेना विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी युती अशी अनेक समीकरणं एकाचवेळी कार्यरत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 हा संपूर्ण अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा ‘हाय व्होल्टेज’ प्रभाग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे पाठबळ; आमदार संग्राम जगताप

निवडणुकीचा प्रचार जसजसा अंतिम टप्प्याकडे जात आहे, तसतशी या लढतीची उत्कंठा वाढत आहे. अखेर मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने झुकतो, काका पत्नीवर मात करतात की पुतणी पुन्हा एकदा आपली जागा कायम ठेवते, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यंत अहिल्यानगरच्या राजकारणात प्रभाग क्रमांक 15 मधील ही लढत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार, यात शंका नाही.

follow us