निवृ्त्तीचे संकेत कुणी दिले?, भाजप नेते नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया

जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम असं मी म्हणालो होतो, असं स्पष्टीकरण राणेंनी दिलं.

News Photo   2026 01 05T192508.750

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे निवृत्तीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. (Rane) शिवसेना, काँग्रेस आणि भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राणे यांनी सिंधुदूर्गातील एका सभेमध्ये बोलताना, त्यांनी राजकारणातील शेवटच्या प्रवासाबद्दल काही वक्तव्य केलं. त्यावरून राणे आता राजकारणातून संन्यास घेणार असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, या विधानावर स्वत: राणे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

“माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करता. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवे ते सहकार्य देतील. कधीतरी थांबायला पाहिजे, असं विधान त्यांनी केलं. या विधानानंतर राणे यांच्या निवृत्तीच्या चर्चा लंगल्या होत्या. त्यावर राणे यांनी ‘निवृत्तीचे संकेत कुणी दिले? असं मी काहीही बोललो नाही. माझं वाक्य नीट ऐका. मी जर लोकांचा रिझल्ट देऊ शकलो नाही, तर माझ्या या पदांचा उपयोग काय? मग मी विचार करेन असं माझं वाक्य होतं असं स्पष्टीकरण राणे यांनी दिलं आहे.

पात्रता नसताना निवडणूक लढवणं म्हणजे घराणेशाही; गिरीराज सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं

जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम असं मी म्हणालो होतो. निवृत्त होतो असं मी म्हणालो नाही, अशा शब्दांत नारायण राणे यांनी निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या. दरम्यान, आपल्या भाषणात राणे “मी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळीच मी म्हटलं होतं की, माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष असेल. त्यामुळे पक्षबदल वगैरे चर्चा करण्याची काही गरज नाही. परंतु, माझा एक स्वभाव आहे. जगेन तर स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाही. पण एवढी पदे मला मिळाली आहेत. त्याचा लोकांसाठी उपयोग करणे गरजेचे आहे. मी पदाची अपेक्षा करत नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मी जे.पी. नड्डा यांची वेळ मागितली आणि त्यांना भेटायला गेलो. तुम्ही मला राज्यसभा देऊ नका, लोकसभा देऊ नका, मला व्यवसाय करायचा आहे असं मी त्यांना सांगितलं. त्यावर राणेजी, तुम्ही राजकारणातून बाहेर जाऊ नका, आम्ही तुम्हाला तसे करू देणार नाही, असं ते म्हणाले होते. पण मी म्हटलं होतं की, माझ्या कुटुंबावर तुम्ही सगळे प्रेम करताय. माझ्यानंतर निलेश-नितेश तुम्हाला हवं ते सहकार्य देतील. मी कधीतरी थांबायला पाहिजे. शेवटी शरीर आहे. दोन्ही चिरंजीव राजकारणात सक्रीय झाल्याने व्यवसायही पाहायला पाहिजे, असं राणे भाषणाच्या वेळी म्हणाले होते.

follow us