Ankush Kakade News : आम्हाला अजित पवारांचंही नेतृत्व मान्य होतं, पण आम्ही आधीपासून शरद पवारांसोबत होतो अन् त्यांच्यासोबतच राहणार, अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं अजित पवारांना भेटून सांगणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी लेट्अपशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
World Cup Qualifiers: झिम्बाब्वेला हरवून 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी श्रीलंका ठरली पात्र
पुढे बोलताना काकडे म्हणाले, शरद पवारांना अजित पवारांचं काहीच माहित नव्हतं, पण छगन भुजबळांनी मुंबईत काहीतरी गडबड असल्याची माहिती शरद पवारांना दिली होती. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली होती. पण याची परिणीती एवढी होईल, असं कोणालाही वाटलं नसल्याचं काकडेंनी सांगितलं आहे.
अजितदादांना उपमुखमंत्रीपदाची घाई; राज्यपालांच्या सुचनेपूर्वीच शपथविधीला सुरुवात
अजित पवार भेटल्यास तुमचंही नेतृत्वही आम्हाला मान्य होतं, आम्ही आधीपासून साहेबांसोबत होतो त्यांच्यासोबत राहणार. पण तुम्ही घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसून पक्षीय पातळीवर आमचा विरोध राहणार पण व्यक्तीगत पातळीवर संबंध चांगलेच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राजकारणात काहीही होऊ शकतं. राज ठाकरेंनीही बाळासाहेबांना सोडून दुसऱ्या पक्षाची स्थापना केली. राज्यातील काही घराण्यातमध्ये राजकारणावरुन कलह झालेला आहे. पवारांच्या घरातही असं काही होईल असं वाटलं नव्हतं हे नेमकं कसं झालंय? काही कळायला मार्ग नसल्याचं काकडेंनी स्पष्ट केलं आहे.
स्टायलिश ज्वेलरीसह रणवीर सिंगच किलर फोटोशूट
अजित पवारांच्या बंडानतर पक्षाबाबत आम्ही कुठलीही न्यायालयाीन लढाई लढणार नाही. आम्ही जनतेत उतरुन न्याय मागणार आणि जनता आम्हाला न्याय देईल, याचा विश्वास शरद पवारांना असल्याचंही काकडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
वळसे-पाटलांनी पवारांना आधीच सांगितलं होतं :
दोन महिन्यांपूर्वी दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवारांशी याबाबत चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते वेगळ्या विचारात असल्याचं वळसे-पाटलांनी पवारांना सांगितलं होतं. त्यावेळी पवार म्हणाले, तुम्हाला तुमच्या पातळीवर काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण हे माझ्यासाठी काही नवीन नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं होतं.
मोदी-केजरीवाल यांच्यातील वाद विकोपाला, केंद्राच्या ‘त्या’ अध्यादेशाची प्रत जाळणार
याआधीही असं शरद पवारांशी घडलं आहे, त्यातून शरद पवार पुन्हा उभारीस आले होते. आताही तिच परिस्थिती, तीच वेळ आली असून शरद पवार पुन्हा उभा राहतील, आजचा दिवस हा क्लेशदायक असून भविष्यात पवारांची ताकद कशी वाढेल याकडं आमचं लक्ष राहणार असल्याची प्रतिक्रिया काकडे यांनी दिली आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं. या बंडांमुळे जे झालं त्याची चिंता नसून उद्या जाहीर सभा घेणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतोदपदी निवडही करण्यात आली आहे.