मोदी-केजरीवाल यांच्यातील वाद विकोपाला, केंद्राच्या ‘त्या’ अध्यादेशाची प्रत जाळणार

मोदी-केजरीवाल यांच्यातील वाद विकोपाला, केंद्राच्या ‘त्या’ अध्यादेशाची प्रत जाळणार

Arvind Kejriwal on Narendra Modi : दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगच्या अधिकाराबाबत केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगबाबतच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दिल्ली सरकारने आव्हान दिले आहे. दिल्लीच्या केजरीवाल सरकारने मोदी सरकारचा अध्यादेश घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशावर तातडीने बंदी घालण्यात यावी, असे केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंग करण्याच्या केंद्राच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्राने 19 मे रोजी अध्यादेश जारी केला होता. या अंतर्गत, दिल्लीत गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीसाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगवर नियंत्रण मिळवणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आहे, असे आपने म्हटले आहे.

Mumbai-Delhi Flight : आता हवाई प्रवास करा मस्त! मुंबई ते दिल्ली विमानप्रवास झाला स्वस्त

अध्यादेशाच्या प्रती जाळणार
आम आदमी पार्टी संपूर्ण दिल्लीत अध्यादेशाच्या प्रती जाळण्याच्या तयारीत आहे. 3 जुलै रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या कार्यालयात केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या प्रती जाळतील. यावेळी आम आदमी पक्षाचे 70 विधानसभेचे नेते, आमदार, मंत्री, नगरसेवक आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत.

Rahul Gandhi In Manipur: राहुल गांधींनी मणिपूरमध्ये उघडले ‘मोहब्बत की दुकान’, पाहा फोटो

6 ते 13 जुलै या कालावधीत विशेष मोहीम
आम आदमी पार्टी 5 जुलै रोजी सर्व 70 विधानसभांमध्ये आणि 6 ते 13 जुलै दरम्यान दिल्ली झोनमध्ये अध्यादेशाची प्रत जाळणार आहे. यादरम्यान जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी पथसंचलनही केले जाणार आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले आहे. भाजपने तिन्ही निवडणुकांमध्ये खूप प्रयत्न केले पण निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळेच आता भाजप आणि केंद्र सरकारला दिल्लीतील जनतेचा बदला घ्यायचा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube