Download App

‘रशिया-युक्रेनने चर्चा करावी, अन्यथा खूप उशीर होईल…’ झेलेन्स्कीसोबतच्या वादानंतर ट्रम्प यांची पुतिनला धमकी

Donald Trump Threatens Impose Major Sanctions On Russia : रशिया-युक्रेन (Russia) युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भूमिका अजूनही अनिर्णीत दिसत आहे. एकीकडे ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर उघडपणे टीका करत आहेत, तर दुसरीकडे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर नवीन निर्बंध लादण्याचा इशारा देत आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मागील आठवड्यात युक्रेनचे अध्यक्ष यांच्याशी झालेल्या जोरदार वादविवादानंतर अमेरिकेचे ( America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा दिलाय.

काल रात्री युक्रेनवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी रशियाविरुद्ध ‘मोठ्या प्रमाणात’ निर्बंध आणि शुल्क लादण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. युक्रेनसोबत युद्धविराम आणि शांतता करार होईपर्यंत अमेरिका हे निर्बंध कायम ठेवेल, असं त्यांनी म्हटलंय.

ट्रम्प यांनी आज घोषणा केली की, ते रशियावर मोठ्या प्रमाणात बँकिंग निर्बंध आणि व्यापार शुल्क लादण्याचा विचार करत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदी आणि अंतिम शांतता करार होईपर्यंत, हे पाऊल लागू राहील असंही ट्रम्प म्हणत आहेत. दोन्ही देशांना वाटाघाटीवर येण्याचा सल्ला देताना ट्रम्प म्हणाले की, रशिया युक्रेनला वाईटरित्या चिरडत आहे. युद्धविराम आणि अंतिम शांतता तोडगा निघेपर्यंत मी रशियावर मोठ्या प्रमाणात बँकिंग निर्बंध आणि शुल्क लादण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.

कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? रिअ‍ॅलिटी शोचं शीर्षकगीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

ट्रम्प यांना नेमके काय हवंय?
अनेकजण म्हणतात की, ट्रम्प यांची नजर युक्रेनच्या खनिजांवर आहे. ते युद्धबंदी कराराच्या मदतीने झेलेन्स्कीच्या खनिजांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही नेत्यांची शेवटची भेट वादात कशी बदलली, हे संपूर्ण जगाने पाहिलं. इतिहासात पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांसमोर अशी चर्चा झालीय. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

ट्रम्प यांच्या विधानाच्या काही दिवस आधी त्यांनी युक्रेनला अमेरिकन लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच, एका जाहीर सभेत त्यांनी झेलेन्स्कीवर अमेरिकेच्या मदतीबद्दल कृतघ्न असल्याचा आरोप केला होता. अमेरिका हा आतापर्यंत युक्रेनचा सर्वात मोठा लष्करी मित्र असल्याने, अनेक पाश्चात्य देशांना हे पाऊल आश्चर्यचकित करणारे ठरले.

‘संभाजी महाराजांसारखा छळ, कारकुनाचा छळ कोणी करीत नाही’, राणे-परबांमध्ये तू-तू मैं-मैं…

ट्रम्प यांच्यावर यापूर्वी रशियाबाबत मवाळ असल्याचा आरोप झाला आहे. अलिकडेच त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, ज्यामुळे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर लादलेले निर्बंध उठवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती. यामुळे अमेरिका आणि त्याच्या युरोपीय मित्र राष्ट्रांमध्ये मतभेद वाढू शकतात, अशी भीती देखील आहे.

युक्रेनची प्रादेशिक अखंडता राखून युद्ध संपवण्याचं आवाहन करणारा ठराव अलीकडेच संयुक्त राष्ट्रांमध्ये मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर, अमेरिकेने रशियासह, त्यांच्या युरोपीय मित्र राष्ट्रांच्या विरोधात मतदान केलंय. ट्रम्प प्रशासनाच्या या पावलावर अमेरिकेत आणि बाहेर टीका होत आहे, कारण ते सूचित करते की ट्रम्पचे प्राधान्यक्रम आता बदलत आहेत. आता ट्रम्प या गोंधळातून कधी बाहेर पडतात, त्यांची धोरणे रशिया-युक्रेन युद्धात नवीन वळण आणतील का? हे पाहणे बाकी आहे.

 

follow us