Download App

‘तो’ शिष्टाचारही भाजपनेही पाळावा; मलिकांवरील फडणवीसांच्या पत्राला अजितदादा गटाचे प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Amol Mitkari on Devendra Fadanvis : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. ते अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसले. यामुळे ते अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधकांना घेरले आहे. त्यांचा रोख हा भाजपकडे होता. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक पत्रच समाजमाध्यमांवर टाकले. मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नाही, असे मत फडणवीसांनी पत्रात व्यक्त केले. त्याला आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उत्तर दिले आहे. महायुतीमध्ये कोणीही मिठाचा खडा टाकू नये, असे आमचे नेते सांगत आहे. तोच शिष्टाचार भाजपने पाळावा, असे आवाहनच मिटकरी यांनी केले आहे.


वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यंतवर आमदारांना घेरल्याचा आरोप; काय म्हणाले समर्थक आमदार?

लेट्सअपशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, नवाब मलिक यांच्याबाबत भारतीय जनता पार्टीची भावना, भूमिका ही वेगळी आहे. हे मान्य आहे. त्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. परंतु नवाब मलिकांवरील आरोप सिद्ध होणे हा भाग वेगळा आहे. महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र सार्वजनिक करणे गरजेचे नव्हते. वैयक्तिका यावर बोलणे गरजेचे होते. पुढे हा प्रश्न निर्माण करणे गरजेचे नव्हते, असा सल्लाही मिटकरींनी फडणवीसांना दिला आहे.

मलिकांवरून भाजपमध्ये नाराजी! देवेंद्र फडणवीसांचे थेट अजितदादांना खुले पत्र

महायुतीमध्ये कोणत्याही पक्षाने मिठाचा खडा टाकू नये, अशा सक्त सूचना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी दिल्या आहेत. हा शिष्टाचार भाजपने पाळावा, असे आवाहन मिटकरी यांनी केले आहे. नवाब मलिक हे आमच्याबरोबर आहेत. त्यांना महायुतीत घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील. फडणवीस यांचीही ही वैयक्तिक भूमिका आहे, असे सांगितले जाते. तर प्रवीण दरेकर हे पक्षाची भूमिका असल्याचे माध्यमांकडे सांगतात. नवाब मलिक यांच्याबाबत पाच वाजता मुख्यमंत्री बोलताना फडणवीस यांनी बोलून मोकळे व्हायला हवे होते, असे मिटकरी म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज