मलिकांवरून भाजपमध्ये नाराजी! देवेंद्र फडणवीसांचे थेट अजितदादांना खुले पत्र
Devedndra Fadavis letter To Ajit Pawar : देशद्रोहाचे आरोप असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांना आज विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळं भाजपवर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपुख्यमंत्र अजित पवारांना पत्र लिहित. मलिकांना महायुतीचा भाग करणं योग्य होणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं.
मलिकांवरून भाजपमध्ये नाराजी! देवेंद्र फडणवीसांचे थेट अजितदादांना खुले पत्र
नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित सलीम पटेल आणि हसिना पारकर यांच्यासह गोवाला कंपाऊंड जमीन व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवाय देशद्रोहाचाही आरोप त्यांच्यावर आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर ते आज पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसले. ते आज हिवाळी अधिवेशनातही सहभागी झाले होते. राष्ट्रवादीतील बंडानंतर ते मलिक कोणत्या गटात सामील होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, आज सभागृहात जाताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि मलिकांबाबत काही सवाल केले. विधिमंडळात जोरदार खडाजंगी झाली. आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांना पत्र लिहिलं.
PM मोदींची भेट अन् इटलीचा चीनला धक्का : PM जॉर्जिया मेलोनी यांचा मोठा निर्णय
फडणवीस यांचं जशच्या तसं पत्र –
श्री. अजितदादा पवार,
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
सस्नेह नमस्कार,
माजी मंत्री व विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्याविषयी आमची वैयक्तीक शत्रूता किंवा आकस अजिबात नाही, हे प्रारंभीच स्पष्ट करतो.
मात्र, ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता त्यांना महायुतीत सहभागी करून घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामिन मिळाल्यानं बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत तर आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र, अशाप्रकारचे आरोप असतांना त्यांना महायुतीचा भाग करणं, हे योग्य होणार नाही, असं आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायंच हा, सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. पंरतू, त्यामुळं महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळं आमचा या गोष्टीला विरोध आहे.
त्यांना देशद्रोह्यांशी संबध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा.
दरम्यान, फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार काय प्रत्युत्तर देणार हेच पाहणं महत्वाचं आहे.