Download App

महाराज माफ करा; कुण्या तोंडानं माफी मागावी? मिटकरींनी संतापजनक ट्वीट करत आगीत तेल ओतले

Shivaji maharaj sindhudurg Statue: महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडू पडावा?

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari tweet with Shivaji maharaj photo of sindhudurg Statue: छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधूदुर्ग किल्ल्यावरील (Chatrapati Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळला आहे. त्यावरून राज्यभर संतापाची लाट आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून थेट सरकारवर निशाणा साधला जात आहे. तर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवरायांच्या पुतळ्यावरुन (Chatrapati Shivaji Maharaj Statue) राजकारण म्हणजे खुजेपणाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटले आहे. परंतु आता अजित पवार गटाचे प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक ट्वीट करून आगीत तेल ओतले आहे.

विधानसभेपूर्वी शिंदे सरकारचा मास्टरस्टोक, आशा स्वयंसेविकांसाठी मोठी घोषणा, मिळणार 10 लाख रुपये

महाराज माफ करा, कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडू पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय, मात्र ज्याला कंत्राट दिलं, त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी, असे मिटकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्याच जागेवर शंभर फुट उंचीचा महाराजांचा पुतळा उभारला जाईल, असे बोलून दाखविले आहे. तर फडणवीस यांनी विरोधकांना फटकारल्यानंतर अमोल मिटकरी यांनी हे ट्वीट केले आहे. मिटकरी यांच्या ट्वीटने महायुतीमध्ये वाद उफाळण्याची शक्यता आहेत.

फडणवीसांनी काय म्हटले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचा पुतळाखाली आला ही आपल्या सर्वांसाठी दु:खद घटना आहे. या घटनेने सर्वांच्या मनाला वेदना झाल्या आहे. शिवरायांचा जो खरा मावळा आहे तो असे फोटो कधीच व्हायरल करणार नाही. हा पुतळा राज्य सरकारने नाहीतर नौदलाकडून तयार करण्यात आला होता. ज्यांनी या पुतळ्याचं काम केलं, त्यांना सदरील ठिकाणच्या जोरदार वाऱ्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडलायं. जोरदार वाऱ्या पाऊसामुळे लोखंड लवकर गंजतं याचं आकलन त्यांना न आल्याने ही घटना घडली. मात्र, आम्ही शिवरायांचा भव्य पुतळा नौदलाच्या मदतीने पुन्हा उभारणार आहोत, या प्रकरणावरुन राजकारण करणं म्हणजे खुजेपणा असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

follow us