शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण म्हणजे खुजेपणाच; देवेंद्र फडणवीसांनी कडक शब्दांत सुनावलं!
Devendra Fadnvis : शिवरायांच्या पुतळ्यावरुन (Chatrapati Shivaji Maharaj Statue) राजकारण म्हणजे खुजेपणाच, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विरोधकांना सुनावलंय. दरम्यान, सिंधूदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. मागील वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं असून यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा सूर विरोधकांकडून आवळण्यात येत आहे. विरोधकांच्या या टीकेवरुन फडणवीस यांनी कडक शब्दांत सुनावलंय. ते मुंबईत बोलत होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन; नांदेडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा खाली आला ही आपल्या सर्वांसाठी दु:खद घटना आहे. या घटनेने सर्वांच्या मनाला वेदना झाल्या आहेत. शिवरायांचा जो खरा मावळा आहे तो असे फोटो कधीच व्हायरल करणार नाही. हा पुतळा राज्य सरकारने नाहीतर नौदलाकडून तयार करण्यात आला होता. ज्यांनी या पुतळ्याचं काम केलं, त्यांना सदरील ठिकाणच्या जोरदार वाऱ्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडलायं. जोरदार वाऱ्या पाऊसामुळे लोखंड लवकर गंजतं याचं आकलन त्यांना न आल्याने ही घटना घडली. मात्र, आम्ही शिवरायांचा भव्य पुतळा नौदलाच्या मदतीने पुन्हा उभारणार आहोत, या प्रकरणावरुन राजकारण करणं म्हणजे खुजेपणा असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
शेअर बाजाराची सुरुवात कासव गतीने; निफ्टी 25,000च्या जवळ, सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत?
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. मुंबईतील वरळीमध्ये दहीहंडीत गोविंदा पथकाकडून अफजलखानाच्या वधाच्या देखावा सादर करण्यात आला. हा देखावा पाहिल्यानंतर आमच्या अंगावर काटा आल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. तसेच या देखाव्याच्या माध्यमातून अफजलखानरुपी कितीही शक्ती स्वराज्यावर चालून आल्या तरीही छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढणार असल्याचा इशाराच फडणवीस यांनी दिलायं.
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात बस नदीत कोसळल्याच्या घटनेत महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जखमींना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली असून रक्षा खडसे, गिरीश महाजन यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केलीयं. मीदेखील या जखमींची भेट घेतली असून तुम्ही ठीक झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नसल्याचं आश्वासन देण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.