Download App

बाबासाहेबांचा अपमान! शाहांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट; CM फडणवीसांनी दुसरी बाजू मांडली

केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट करुन आधी संसदेचा आणि आता जनतेचा वेळ वाया घालत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुसरी बाजू मांडलीयं.

Cm Devendra Fadanvis : केंद्रीय मंत्री अमित शाहा (Amit Shah) यांचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट करुन आधी संसदेचा आणि आता जनतेचा वेळ वाया घालत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अमित शाहांच्या विधानावर दुसरी बाजू मांडलीयं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानाच्या चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलायं. या मुद्द्यावरुन देशभरात शाहांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच आज नागपुरातून माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या विधानाबाबतचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करुन संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलत होते. काँग्रेसने बाबासाहेबांना कसा विरोध केलायं, ते यावेळी सांगत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि आरक्षणाला गांधी-नेहरु कुटुंबाचा विरोध राहिल्याचे पुरावे पंतप्रधान मोदींनी संसदेत समोर आणले, तेव्हा आता काँग्रेसकडून हे नाटक सुरु असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

नव्या वर्षाची प्रसाद करणार धमाकेदार सुरूवात, बसणार पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत!

तसेच बाबासाहेबांना काँग्रेसने कधीच निवडून येऊ दिलं नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणच्या जागेवर स्रमारक व्हावं, यासाठी आंदलोने करावे लागली पण सुईच्या टोकाएवढी जमीनदेखील काँग्रेसने दिली नाही पण मी मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींकडे गेलो आणि तीन दिवसांत दोन हजार कोटींची जमीन राज्य सरकारला दिली आता स्मारक होत आहे. लंडनमधलं बाबासाहेबांचं घर लिलावात विकलं जात होतं तेव्हा काँग्रेसने लक्ष दिलं नाही ते घर आम्ही घेतलं, महू, दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचं काम भाजपने केलं, काँग्रेसने फक्त बाबासाहेबांच्या नावाचा वापर करुन राजकारण केलं त्यांनी कधीही बाबासाहेबांचा सन्मान केलेला नाही. डॉ. आंबेडकरांना काँग्रेसने भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केलीयं.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

काँग्रेसने माफी मागायला हवी…
केंद्रीय मंत्री अमित शाहांचा अर्धवट व्हिडिओ ट्विट करुन काँग्रेसने संसदेचा वेळ खराब केला आहे, आता ते जनतेचा वेळ खराब करीत आहेत. संसदेत बोलताना मोदींनी काँग्रेबाबत विधान केलं, बाबासाहेबांना आणि आरक्षणाला नेहरु-गांधी घराण्याचा कसा विरोध राहिलायं हे पुराव्यासहित मोदींनी जगासमोर आणलं तेव्हा काँग्रेस आता नाटक करण्याच काम करीत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

बीड जिल्ह्यात कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही..
बीडच्या सरपंच हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, बीडचा पालकमंत्री कोण होणार? याबाबत महायुतीचे तिन्ही नेते, अजितदादा, एकनाथ शिंदे आम्ही बसून ठरवणार असून बीडमध्ये कोणाचाही दादागिरी चालवू देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

follow us