Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. केजरीवाल यांना ईडीने अबकारी (मद्यधोरण) घोटाळ्या प्रकरणी 21 मार्चला अटक केली होती. तर आता ईडीने उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल हे ‘अबकारी घोटाळ्याचे’ मुख्य सूत्रधार आहेत असे सांगितले आहे.
और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी
केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या आप नेत्याच्या याचिकेला उच्च न्यायालयात ईडीने विरोध करत सांगतिले की, गुन्ह्याच्या कमाईचा “प्रमुख लाभार्थी” असलेला राजकीय पक्षाने केजरीवाल यांच्यामार्फत गुन्हा केला. केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचे मंत्री, आप नेते आणि इतरकाही व्यक्तींच्या संगनमताने दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळा केला असं देखील उच्च न्यायालयात ईडीने सांगितले.
संजय राऊत आता काँग्रेसही संपवणार, काँग्रेसमधील नेत्याचा हल्लाबोल!
या याचिकेला विरोध करत ईडीने न्यायालयात सांगितले की, आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामार्फत मनी लाँड्रिंगचा गुन्हा केला आहे. हा गुन्हा कलाम 70, पीएमएलए 2002 मध्ये समाविष्ट आहेत.
आम आदमी पार्टी दिल्ली मद्यधोरण घोटाळ्यात निर्माण झालेल्या पैशाचा प्रमुख लाभार्थी आहे. आम आदमी पार्टीचे केजरीवाल केवळ मुख्यमंत्री नसून ते या पक्षाचे संस्थापकांपैकी एक आहे. यामुळे त्यांचा या पक्षावर संपूर्ण नियंत्रण आहे.
मद्यधोरण प्रकरणात साक्षीदारांच्या विधानांवरून हे स्पष्ट झाले आहे की, धोरणाचा निर्णय घेण्यातही केजरीवाल यांचा सहभाग होता. बुधवारी न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्यासमोर सुनावणीसाठी ही याचिका सूचीबद्ध आहे.
इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या, तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप