पवार, ठाकरेंसमोर नांग्या, पण होणाऱ्या पराभवाचं खापर माझ्यावर कॉंग्रेस नेत्यांवर चव्हाणांचा पलटवार

Ashok Chavhan Criticize Congress Leaders : महाविकास आघाडीच्या ( MVA ) जागा वाटपामध्ये राज्यातील कॉंग्रेस ( Congress) नेत्यांनी पवार, ठाकरेंसमोर नांग्या टाकल्या पण आता ते होणाऱ्या पराभवाचं खापर माझ्यावर फोडत असल्याचा पलटवार नुकतेच भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी केला आहे. ते कॉंग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी […]

पवार, ठाकरेंसमोर नांग्या, पण होणाऱ्या पराभवाचं खापर माझ्यावर कॉंग्रेस नेत्यांवर चव्हाणांचा पलटवार

Ashok Chavhan

Ashok Chavhan Criticize Congress Leaders : महाविकास आघाडीच्या ( MVA ) जागा वाटपामध्ये राज्यातील कॉंग्रेस ( Congress) नेत्यांनी पवार, ठाकरेंसमोर नांग्या टाकल्या पण आता ते होणाऱ्या पराभवाचं खापर माझ्यावर फोडत असल्याचा पलटवार नुकतेच भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी केला आहे. ते कॉंग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रीया दिली.

धोत्रेंचं व्हेंटिलेटर भाजप कधीही काढले, पटोलेंच्या टीकेवर शेलार म्हणले, ‘पटोले निर्बुध्द…’

काय म्हणाले अशोक चव्हाण?

कॉंग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला आलेलं अपयश आणि भविष्यात होणारा पराभव या सर्वांचे खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्याचे काँग्रेससाठी करत आहे. ही अत्यंत हास्यस्पद बाब आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांची धूळधाण केली आहे. तर काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरेजाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. तसेच पक्षश्रेष्ठींना उत्तरही त्यांना देता येत नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या माझ्यावर केले जाणारे आरोप म्हणजे नाचता येणे अंगणाकडे असे आहेत. अशी टीका यावेळी अशोक चव्हाण यांनी केली.

Ekta Kapoor: ‘लव सेक्स और धोखा 2’ चे पहिले गाणे रिलीज होताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान गेल्या महिन्यातच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण हेच महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पेचाला जबाबदार आहेत. असा आरोप सध्या राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. कारण जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेत चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची होती. या प्राथमिक चर्चेत काँग्रेसच्या पारंपारिक मतदार संघावर दावा करण्याऐवजी अन्य मतदारसंघावर दावा करण्यात आला.

त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने काँग्रेसच्या पारंपारिक मतदार संघांवर दावा केला. ज्यामध्ये सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई ही काही त्याची उदाहरणे आहेत. तसेच पक्षांतर करायचं असल्याने अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये घोळ करून ठेवला. असं संशय काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केला जातो. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत चव्हाण यांनी कॉंग्रेसला प्रत्युत्तर दिले आहेत.

Exit mobile version