धोत्रेंचं व्हेंटिलेटर भाजप कधीही काढले, पटोलेंच्या टीकेवर शेलार म्हणले, ‘पटोले निर्बुध्द…’

धोत्रेंचं व्हेंटिलेटर भाजप कधीही काढले, पटोलेंच्या टीकेवर शेलार म्हणले, ‘पटोले निर्बुध्द…’

Ashish Shelar on Nana Patole : अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धोत्रे हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अकोल्यातील प्रचार सभेत बोलताना धोत्रेंबाबत वक्तव्य करून भाजपवर टीका केली. त्यावरून आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आता भाजप नेते आशिष शेलारांनी (Ashish Shelar) पटोलेंवर जोरदार टीका केली. पटोले हे निर्बुद्ध असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.

Ekta Kapoor: ‘लव सेक्स और धोखा 2’ चे पहिले गाणे रिलीज होताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात 

गुरुवारी (४ एप्रिल) अकोल्यातील काँग्रेसच्या प्रचार सभेत पटोले म्हणाले, खासदार संजय धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. पण, भाजप निवडणुकीत त्याचं व्हेंटिलेटर काढेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पटोलंच्या वक्तव्याविषयी आशिष शेलार यांना विचारले असता ते म्हणाले की, नाना पटोले हे एका पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं ते निर्बुद्ध नसतील, असा आमचा समाज होता. मात्र, ते निर्बुद्ध आहेत, याचा परिचय ते स्वतः देत आहेत. इतक्या हीन पातळीवरील राजकारण केवळ काँग्रेस आणि नाना पटोले करू शकतात, अशी टीका शेलारांनी केली.

महायुती सरकारमध्येही भ्रष्टाराचा प्रयत्न, दिल्लीत तक्रार केली; सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट 

काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे लबाडा घरचे आवतन
आज कॉंग्रेसने आपला जाहिरनामा जनतेसमोर मांडला. त्यात कॉंग्रेसने जनतेला अनेक आश्वासने दिली. त्यावरही शेलारांनी भाष्य केलं. ते म्हणाले, कॉंग्रेसचा जाहीरनामा म्हणजे, फसवेगिरीचा धंदा आहे. काँग्रेसच्या लबाड्या समोर येऊ लागल्या आहेत 450 ला सिलेंडर देऊ म्हणणारे आपलं सरकार असलेल्या राज्यात किमती कमी करू शकले नाही. पेट्रोल, गॅस, सबसिडीचे दर कमी करू शकलेले नाहीत. काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे लबाडा घरचे आवतन आहे.

पटोलेंकडून असंवेदनशीलतेचा कहर
पटोले यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकीकडे काँग्रेस पक्ष दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो आणि दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या मृत्युची कामना करतात. हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. आपण विरोधक असलो तरी मृत्युची कामना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पटोलेंनी महाराष्ट्र आणि जनतेची माफी मागावी, असं फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube