महायुती सरकारमध्येही भ्रष्टाचाराचा प्रयत्न, दिल्लीत तक्रार केली; सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट

महायुती सरकारमध्येही भ्रष्टाचाराचा प्रयत्न, दिल्लीत तक्रार केली; सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट

Kirit Somayya On Mahayuti : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी अनेकदा विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना राजकीय विरोधकांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सळो की पळो करून सोडलं होत. दरम्यान, आता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या महायुती (Mahayuti) सरकारमध्ये घोटाळ्याचे प्रयत्न झाले. त्याची दिल्लीत तक्रार केल्याचं सोमय्या म्हणाले.

Nilesh Lanke : सभेचे नियोजन फिस्कटले लंके परतले…जनसंवाद नव्हे तर ही फसवणूक यात्रा… भाजपचा हल्लाबोल 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोमय्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षात महायुती सरकारमध्ये घोटाळ्याचे प्रयत्न झाले. कारण सध्या बाहेरच्या पक्षातून आलेले जास्त आहेत. त्यांनी भाजपला सोबत घेऊन घोटाळे करण्याचा प्रयत्न केला. त्याची दिल्लीत तक्रार केली. दिल्लीत सांगितलं की, आधी एक मंत्री घोटाळा करायचा, आणि एकटा करायचा. तर आता त्यांनाी भाजपला सोबत घेतलं. पण, इथं भ्रष्टाचार करणारे कंट्रोलमध्ये आहेत, असं सोमय्या म्हणाले.

Ayushman Khurana सांगतोय टूटे दिल की दास्तान; ‘अंख दा तारा’ नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 

तुम्हाला मातोश्रीवर हल्ला करायला कोणी सांगितलं? तुमच्या पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का? असा प्रश्न विचारला असता सोमय्या म्हणाले की, एक गोष्ट सगळे मान्य करतात की, किरीट सोमय्या हे पक्षाचे शिस्तबध्द कार्यकर्ता आहे. यात आलं सगळं उत्तर. माझ्या पक्षाने मला ज्या ज्यावेळी जे जे सांगितलं, ते मी केलं. मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचारातून मुक्त व्हावी, अशी माझी स्वत:ची इच्छा होती. मुंबई महापालिकेला मातोश्री आणि त्यांच्या माफिया कंत्राटदारापासून मुक्त केलं पाहिजे, पण ठाकरे नको, हे मी फडणवीसांना सांगितलं. देवेंद्रजींना सांगितलं की, हा पक्षाचा आदेश आहे की, त्यांनी जो काही गोंधळ घातला असेलं, जो महापालिकेशी संबंधित असेल, तर काढायला हवा.

ठाकरे सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांच्यामागे चौकशी लावणे ही तेव्हाची राजकीय गरज होती. जर तसं केलं नसतं, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी भाजप संपवली असती, विरोधकांना संपवलं असतं, जेलमध्ये टाकलं असतं, असंही सोमय्या म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज