Download App

आशुतोष काळेंनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

  • Written By: Last Updated:

Ashutosh Kale vote along with his family in Kopargaon : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात (Assembly Elections 2024) मतदान पार पडत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी (Ashutosh Kale) आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे आणि जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी मतदान केले. देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी सर्वांनीच मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

राहुल कलाटे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये 6.61 टक्के मतदान झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये कुठे किती मतदान झालं, याची अधिकृत आकडेवारी देखील समोर आली आहे.

सापळ्यामध्ये कधी चुकून माणूस अडकतो ; तावडेंवरील आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

राज्यात आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. अहमदनगर विधानसभा मतदारसंघात दीडवाजेपर्यंत 36.29 टक्के मतदान झालंय. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये 6.61 टक्के मतदान झाले आहे.दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झालंय.

 

follow us