Jayshree Thorat On Sujay Vikhe : माझ्या बापाविषयी बोलाल तर याद राखा…ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही ते आपलं घर काय सांभाळणार या शब्दांत बाळाासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातांनी (Jayashree Thorat) माजी खासदार सुजय विखेंना (Sujay Vikhe) इशारा दिलायं. दरम्यान, संगमनेरातील तळेगावमध्ये विखे यांनी थोरात यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर जयश्री थोरातांनी दिलंय. युवक काँग्रेसच्या आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.
शर्वरीच्या फिटनेसची जबरदस्त झलक! Monday Motivation म्हणत जिंकली चाहत्यांची मने
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच सुजय विखे संगमनेर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर तळेगावात आयोजित मेळाव्यात सुजय विखे यांनी संगमनेरच्या विकासावरुन बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे, यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते.
सुजय विखे यांच्या या टीकेनंतर संगमनेरात एकच चर्चा सुरु झाली. त्यानंतर युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना जयश्री थोरात म्हणाल्या, बाळासाहेब थोरात संगमनेर तालुक्याचे स्वाभिमान आहेत, संगमनेरकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. माझ्या बापाविषयी बोलाल तर याद राखा, ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार, या शब्दांत जयश्री थोरातांनी विखेंना प्रत्युत्तर दिलंय.
पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग; नुकतंच झालंय उद्घाटन, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात
तसेच राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून त्रास सुरु झालायं, बाळासाहेब थोरातांनी त्यांचं काहीही वाईट केलेलं नाही. थोरात हे सर्वाधिक काळ महसूल मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी कोणाचं वाटोळं केलेलं नाही. कोणालाही त्रास दिलेला नाही, असं जयश्री विखे म्हणाल्या आहेत.
तोडून फोडून राज्यात खोके सरकार सत्तेवर आलंय. तेव्हापासूनच थोरात यांना त्रास देण्याचं काम सुरु झालंय. थोरातांनी कोणाचंही वाटोळं केलेलं नाही. गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे म्हणून थोरातांनी विरोधकांच्याही महाविद्यालयांना परवानगी मिळवून दिलीयं. ते कधीच कोणाशी वाईट वागलेले नाहीत, त्यांनी काहीही वाईट केले नाही, तुम्हा त्यांना एवढा त्रास का देतायं? असा खडा सवाल थोरात यांनी यावेळी केलायं.
आधी तुमच्या तालुक्याची अवस्था पाहा…
मागील 50 वर्षांपासून राहता तालुका त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी राहता तालुक्याचे काय हाल करुन ठेवलेत पाहा, कधीच कोणालाही मोठं होऊ दिलं नाही. शिर्डी मतदारसंघात 2009 साली ते पडता पडता वाचले होते. या मतदारसंघातील 28 गावांना तुम्ही त्रास दिला नसता तर ही गावं तुमच्याबरोबर असती, पण तुम्ही त्रास देण्याचं काम केलंय. जोर्वे बाळासाहेब थोरातांचं गाव आहे, या गावातल्या जनतेला तुम्ही त्रास दिला तर मी नुसतं बोलत नाही तर करुन दाखवेन, असा थेट इशारा थोरात यांनी विखेंना दिलायं.
काय म्हणाले होते सुजय विखे?
आजची सभा हा फक्त ट्रेलर आहे. तालुक्यात परिवर्तन होणार. यात महिलांचा खूप मोठा वाटा असणार. दहशत झुगारून परिवर्तनासाठी ठेकेदारी संस्कृतीविरोधात युवकांनी उभं राहावं. मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे, यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाही, असा घणाघात सुजय विखे यांनी थोरात यांच्यावर केला होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सुजय विखे संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, यासंदर्भात त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. संगमनेरात थोरात-विखे यांच्यात लढत झाल्यास ही लढत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार? लढत कोणामध्ये असणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.