पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला भीषण आग; नुकतंच झालंय उद्घाटन, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात
fire at Mandai Metro Station : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नव्याने उद्घाटन झालेल्या मंडई मेट्रो स्टेशनला मध्यरात्री भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशन येथे तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करीत आग आटोक्यात आणणयाचं काम झालं. या घटनेत कोणीही जखमी नसून वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कोणत्या 6 राशीच्या लोकांना नुकसान होऊ शकते
सध्या आग नियंत्रणात आणण्यात आली असून, यामध्ये कोणीही जखमी नसल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाकडून तातडीने 5 वाहने रवाना करत आग पाचच मिनिटात आटोक्यात आणली. जवानांनी श्वसनरहित अग्निशमन उपकरणाचा वापर करत पाणी मारुन आग विझवली. जखमी कोणी नसून वेल्डिंगचे काम सुरु असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सेवेवर परिणाम नाही
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावप पोस्ट करत घटनेची माहिती दिली आहे. तसंच मेट्रो सेवेमध्ये कोणताही परिणाम होणार नसल्याचं देखील खासदार मोहोळ म्हणाले आहेत. मोहोळ यांनी लिहिलं आहे की, मंडई मेट्रो स्टेशनची आग नियंत्रणात, सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार काही वेळापूर्वी घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.