Download App

“त्यांना माझ्या शुभेच्छा पण, निवडणुका फक्त”.. सोनवणेंना तिकीट मिळताच पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?

Pankaja Munde on Sharad Pawar NCP Candidate List : शरद पवार गटाने काल उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha) बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता या मतदारसंघात पंकजा मुंडे आणि (Pankaja Munde) बजरंग सोनवणे यांच्यात सामना निश्चित झाला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा देत सरळ आव्हानही देऊन टाकलं. त्यांचं तिकीट जाहीर झालं त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. माझी निवडणुकीची तयारी ही निवडणूक जाहीर झाल्यापासून नाही तर पाचही वर्ष सुरुच असते. सामाजिक काम सतत सुरू असते. त्यामुळे निवडणूक जाहीर झाली म्हणून त्यात काही फरक पडणार नाही. आता विरोधात कुणी ना कुणी उमेदवार येणार होताच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला. बजरंग सोनवणे म्हणतात की मागील वेळी मोदी लाट होती. परंतु, यंदा तसे नाही समाज मागे आहे असे पत्रकारांनी विचारले. त्यावर मुंडे म्हणाल्या, निवडणुकीत असे कोणत्याही उमेदवाराला वाटणे स्वाभाविक आहे. जसं त्यांना वाटतं तसंच मलाही वाटतं. पण लाट आणि त्सुनामी हा वेगळा मुद्दा झाला. फक्त पाच वर्षात लोकांसमोर येऊन मतं मागण्यासाठी निवडणुका नसतात. ज्या पाच साडेपाच लाख लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी तु्म्ही काही करता की नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचता की नाही या गोष्टीचा लोक नक्कीच विचार करतील.

UdayanRaje Bhosle : ‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’

जागावाटपात भाजपाचा मित्रपक्षांवर दबाव आहे असं वाटतं का या प्रश्नावर मुंडे यांनी सावध उत्तर देत प्रतिक्रिया देणे टाळले. या चर्चा मी सुद्धा ऐकते आहे. परंतु, या प्रक्रियेचा भाग मी नाही. यावर मी काही बोलणार नाही. या गोष्टी माध्यमांतून आमच्यासमोर येत असतात. त्यामुळे यावर टिप्पणी करणे आवश्यक वाटत नाही. आता आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आहे. त्यामुळे या पक्षाला सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Ncp Sharad Pawar Group) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) दुसरी यादी काल जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Loksabha Election: ज्योती मेटे या पंकजा मुंडेंचे गणित बिघडविणार?

follow us

वेब स्टोरीज