Download App

पुरावे असतील तर नक्की द्या, लोकसभेत EVM नव्हतं का? किरीट सोमैय्यांचे थेट चॅलेंज

BJP Leader Kirit Somaiya On EVM Allegations : माळशिरस विधानसभा मतदारसंघात आज मारकरवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार होते. परंतु आमदार जानकर यांनी ते रद्द झाल्याची माहिती दिलीय. यावर भाजप नेते किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. सोमैय्या म्हणाले की, वास्तविक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना स्वीकारली आहे. निवडणूक आयोग मतदान (EVM) योग्यरित्या घेत असते. पद्धतीमध्ये कुठे चूक आढळली, तर न्यायालयात जाऊ शकता.

उत्तम जानकर यांच्यावर बोलताना ते म्हणाले की, जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतील तर ठीक आहे. पण निवडणूक आयोगावर (Mahavikas Aghadi) प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर आयोग त्याची दखल घेईल.

सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली! भाजपचं केंद्रीय शिष्टमंडळ आज मुंबईत; विधीमंडळ नेता ठरणार?

निवडणूक आयोगावर (Election Commission) प्रश्नचिन्ह टाकण्यासाठी कोणी असे प्रयत्न करत असेल, तर निश्चितपणे निवडणूक आयोग दखल घेईल असं देखील किरीट सोमैय्या म्हणाले आहेत. आयोगाने नाना पटोले यांना आज बोलवले आहे. काही पुरावे असतील तर नक्की द्यावे, असं देखील किरीट सोमैय्या म्हणाले आहेत. यावेळी किरीट सोमैय्या यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम नव्हतं का? असा सवाल विचारला आहे. गेले काही दिवस ईव्हीएम हॅक केले जाणार, असं सोशल मीडियावर दाखवल जात होतं. त्याबद्दल मी तक्रार केली आहे , दिल्लीत अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं देखील सोमैय्या म्हणाले आहेत.

कुणाचं नाक तुटलं तर कुणाचा डोळा दुखावला..घातक दुखापतींमुळे ‘या’ दिग्गजांचं क्रिकेट थांबलं

निवडणूक आयोग अशा प्रकारे व्हिडीओ व्हायरल करू शकत नाही. 2019 ला देखील अशाच प्रकारे व्हिडिओ व्हायरल केले होते, असं सोमैय्या म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये अडचण असताना देखील ते धडपड करत आहेत. लवकरच शिंदे साहेब मैदानात येणार आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. शिंदे यांनी खूप मेहनत केली. त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण आलाय. ईश्वराने त्यांची तब्येत लवकर बरी करावी, अशी प्रार्थना देखील सोमैय्या यांनी केलीय. ते विवेक आणि नम्रतेच्या हिताचे काम करीत आहेत. कोणीही वेगळी भाषा वापरू नये, अशी विनंती देखील किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

 

follow us