Kirit Somaiya : PAP घोटाळ्याचा प्रसाद पवार कुटुंबालाही भेटला; सोमय्यांचा मोर्चा पवारांकडे
Kirit Somaiya : वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि यांच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. यावेळी त्यांनी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेचा घोटाळा अर्थात पीएपी घोटाळ्याचा प्रसाद शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाला देखील भेटला आहे असा आरोप केला आहे.
नवीन वर्षात सनी लिओनीचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध, गाणं ऐकून व्हाल शॉक
हा घोटाळा 20 हजार कोटींचा आहे. ज्यामध्ये शाहिद बलवा आणि पवार यांचे निकटवर्ती चोरडिया यांना लाभ मिळाला आहे. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यामध्ये 1903 सदनिका बांधल्या जात आहेत. त्यासाठी वेगवेगळी आरक्षण हटवली जात असल्याचे देखील सोमय्या म्हटले. भांडूप येथील 1903 सदनिकेचा कॉन्ट्रॅक्ट चोरडीया बिल्डरचा पुणे येथील न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. ला देण्यात आला. न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने यासाठी शरद पवारांचे बंधू प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनी सोबत केला आहे. ही जागा प्रताप पवार यांच्या Neo Star Infra Projects Pvt. Ltd. कंपनीची आहे.
मुंबईतील हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचे लग्न, हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींना नको त्या अटी?
त्याचबरोबर या सदनिका बांधण्यासाठीचे डेव्हलपमेंट राईट, करार चोरडिया समूहाच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी. कंपनीने केले आहे. 1903 सदनिका महापालिका बाजारभावाने रु. 58 लाखात एक सदनिका प्रमाणे घेणार आहे. ही सदनिका बांधण्यासाठी जमीन व बांधकामाचा खर्च म्हणून 15 ते17 लाख खर्च होणार आहे. म्हणजेच एका सदनिकेच्या मागे रुपये 40 लाख नफा शरद पवार यांचे बंधू प्रताप पवार यांची कंपनी व चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला मिळणार आहे.
Truck Driver Strike चा असाही परिणाम; पेट्रोल अभावी झोमॅटो बॉयची थेट घोड्यावरून…
प्रताप पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. चे शेअर कॅपिटल फक्त रुपये 1 लाख आहे. परंतु या कंपनीत 2021 मध्ये 19 मार्च 2021 रोजी सिरम इन्स्टिट्युटने रुपये 435 कोटी 6% व्याज या दराने वीस वर्षासाठी या कंपनीत प्रेफरेन्स शेअर कॅपिटल म्हणून गुंतवले आहेत. या कंपनीने कोविड लस बनवले होते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.
1 लाखाचे शेअर कॅपिटल प्रताप पवार व त्यांच्या पत्नीची त्याच्यासमोर रुपये 435 कोटीचे गुंतवणूक 6% दराने सिरम इन्स्टिट्युट यांनी केली आहे.रुपये 100 कोटीच्या गुंतवणुकीच्या समोर रुपये 1000 कोटीचा भांडूप PAP घोटाळ्याचा फायदा/लूट चोरडिया यांचे न्यू वल्ड लँडमार्क एल.एल.पी कंपनीला करण्यात Neo Star Infra projects कंपनीही सहभागी झाली आहे. त्यामुळे या PAP घोटाळ्याची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी. अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.