नवीन वर्षात सनी लिओनीचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध, गाणं ऐकून व्हाल शॉक

नवीन वर्षात सनी लिओनीचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध, गाणं ऐकून व्हाल शॉक

Sunny Leone Performance: अभिनेत्री-उद्योजक सनी लिओनसाठी (Sunny Leone) 2024 हे वर्ष दणक्यात साजरा झालं आहे आणि याच कारण देखील तितकच खास आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका शानदार शोमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री सनीने कोलकाता (Kolkata) येथील प्रतिष्ठित जे डब्ल्यू मॅरियटमध्ये (JW Marriott) तिच्या अफलातून परफॉर्मन्सने प्रेक्षकांना आपलंसं केल आणि 2024 ला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जे डब्ल्यू मॅरियट कोलकाता येथे सनी लिओनीने तिच्या अनोखा परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या आकर्षक आणि करिष्माईने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. 2024 मध्ये सनी ‘ग्लॅम फेम’च्या (Glam Fame) जजिंग पॅनेलची जज बनणार आहे आणि अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) ‘केनेडी’ रिलीज होण्याची ती वाट बघत आहे. यामध्ये राहुल भट्ट आहे, तसेच तिचा पहिला तमिळ चित्रपट ‘कोटेशन गँग’, जिथे ती जॅकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी माधुरी दीक्षितच्या आयकॉनिक गाण्याची सनी लिओनीने अनोखी झलक दाखवली होती. या गाण्यात सनीचा रोमांचक परफॉर्मन्स बघायला मिळत होत. खूप अपेक्षेनंतर आता गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. अखेर हे रोमांचक गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे दुसरे तिसरे कोणी नसून “मेरा पिया घर आया” आहे, जे मूळत: 1995 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘याराना’ सिनेमात प्रदर्शित केले गेले होते. या गाण्याने युट्युबवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

मुंबईतील हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचे लग्न, हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींना नको त्या अटी?

हे नवीन गाण याराना (1995) मधील ‘मेरा पिया घर आया’ हा 1990 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय नृत्य क्रमांकांपैकी एक आहे. तिच्या अभिव्यक्तीपासून ते स्टेप्सपर्यंत माधुरीने या गाण्यात चांगलाच तडका लावला होता, आणि आपण नक्कीच तिच्यापासून नजर हटवू शकलो नाही. कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी गायलेले, अनु मलिक यांनी संगीत दिलेले आणि माया गोविंद यांनी लिहिलेले हे गाणे आहे. आणि आता हेच गाणे नवीन अंदाजात बघायला मिळत आहे.

या रिमेकच्या चर्चा सगळीकडे होत असताना आता हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली यांनी केले आहे. या गाण्याला अनू मलिकने संगीतबद्ध केले आहे तर गाण्याचे बोल माया गोविंद यांचे आहेत. तसेच हे गाणे नीती मोहनने गायले आहे. सध्या सर्वत्र गाण्याची चर्चा रंगली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube