Sunny Leone: यंदाचं वर्ष ठरलं सनीसाठी सर्वात खास, नेमकं कारण काय? जाणून घ्या…

Sunny Leone: यंदाचं वर्ष ठरलं सनीसाठी सर्वात खास, नेमकं कारण काय? जाणून घ्या…

Sunny Leone: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्डनेसमुळे कायम चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर (Social media) सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या कायम संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडनंतर आता सनी मराठी चित्रपटसृष्टीत येणार आहे. मात्र 2023 अवघ्या काही दिवसांनी संपणार असून अभिनेत्री सनी लिओनी साठी (Sunny Leone) हे वर्ष अनेक कारणासाठी खास ठरलं आहे.

“केनेडी” सह तिच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील (Film Festival) पदार्पण असू दे किंवा तिच्या व्यवसायाची नवी सुरुवात हे वर्ष तिच्यासाठी अफलातून ठरला. कान्समधील तिच्या यशानंतर सनी लिओनने “केनेडी” द्वारे जागतिक ओळख मिळवली. मेरा पिया घर आया 2.0′ (Mera Piya Ghar Aaya 2.0) आणि ‘थर्ड पार्टी’ (Third Party) या तिच्या म्युझिक व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले. विशेष म्हणजे तिच्या लैला या गाण्याला 1 अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.

Nana Patekar: नानांची नाना रुपं, ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना पाटेकर

तिच्या मनोरंजन (entertainment) कारकिर्दीच्या पलीकडे सनीने पती डॅनियल वेबर सोबत “स्टार स्ट्रक बाय सनी लिओन” या कॉस्मेटिक ब्रँडचा विस्तार केला. राइज एनर्जी बार आणि स्लीप एड कंपनीमध्ये गुंतवणूक केली. तिने “स्प्लिट्सव्हिला” या टेलिव्हिजन शोचा ती भाग झाली. सनी लिओनीचे 2024 मध्ये अनेक नवनवीन प्रोजेक्ट येणार असून ती ‘ग्लॅम फेम’ आणि अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ मध्ये दिसणार आहे. रिलीज होणार आहे. येत्या वर्षात रिलीजसाठी सेट केलेले तीन चित्रपट पूर्ण केले आहेत. ज्यापैकी तिचा पहिला तमिळ चित्रपट, ‘कोटेशन गँग’ असणार आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केनेडी’च कौतुक झाल्यानंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि सनी लिओनी आणि राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. खास आग्रह केल्यामुळे आता या चित्रपटाचं दुसरे स्क्रीनिंग शेड्यूल करण्यात आले आहे. 5 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या रीगल सिनेमामध्ये केनेडीचं खास स्क्रिनिंग पार पडणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज