‘निशाणची’ चा ट्रेलर ठरला सुपरहिट; ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो पोहोचले लालबागच्या राजाच्या चरणी!

  • Written By: Published:
Nishanchi Trailer

Nishanchi Trailer : यंदाच्या सर्वात चर्चेत असलेल्या आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला ‘निशाणची’ आता प्रदर्शानाच्या तयारीत आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ यांसारखे कल्ट क्लासिक चित्रपट देणारे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा हा चित्रपट आहे. यात ऐश्वर्य ठाकरे यांचा अभिनयात पदार्पण होत असून, त्यांच्या जोडीला वेदिका पिंटो झळकणार आहे. नव्या जोडीच्या केमिस्ट्रीने आणि ऐश्वर्य यांच्या पदार्पणामुळे आधीपासूनच चित्रपटाभोवती मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कालच या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. कथानकातील गुंतवणूक, दमदार संवाद, आणि मुख्य कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

या ट्रेलरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, ऐश्वर्य ठाकरे (Aishwarya Thackeray) , त्यांची आई स्मिता ठाकरे (Smita Thackeray) आणि सहकलाकार वेदिका पिंटो (Vedika Pinto) हे तिघेही मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यावेळी या तिघांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आगामी चित्रपटासाठी आशीर्वाद मागितले. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून, चित्रपटाभोवतीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘निशाणची’ च्या ट्रेलरमध्ये आऐश्वर्य ठाकरे हे बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची दुहेरी भूमिका साकारताना दिसतात – दिसायला सारखे पण विचारांनी आणि स्वभावाने संपूर्ण भिन्न. 2000 च्या दशकातल्या उत्तर प्रदेशातील छोट्या शहरात घडणारी ही कथा प्रेम, संघर्ष, द्वेष आणि गुन्हेगारीने भरलेली आहे. बबलूचं रिंकूवरील प्रेम असो किंवा डबलूचा अडथळा निर्माण करणारा स्वभाव – ट्रेलरमधून अ‍ॅक्शन, इमोशन आणि थराराचा भरपूर अनुभव मिळतो.

हा चित्रपट अनुराग कश्यप यांच्या खऱ्या आणि थेट शैलीतील कथाकथनातला आणखी एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. चित्रपटात ऐश्वर्य आणि वेदिका यांच्यासह मोनीका पंवार,मोहम्मद झिशान अय्युब, आणि कुमुद मिश्रा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अजय राय आणि रंजन सिंग यांच्या Jar Pictures आणि Flip Films यांच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती झाली आहे.

… तर येत्या निवडणुकीत धुरळा उडवू; आरक्षणावर जरांगे पाटील पुन्हा आक्रमक भूमिकेत

कथालेखन प्रसून मिश्रा, रंजन चंदेल, आणि अनुराग कश्यप यांनी मिळून केले आहे. आता पाहा गोळ्या, गद्दारी आणि बंधुत्वाची ही स्फोटक कथा 19 सप्टेंबर रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube