उद्धव ठाकरेंना हिशोब द्यावा लागेल, किरीट सोमय्यांनी दिला थेट इशारा

उद्धव ठाकरेंना हिशोब द्यावा लागेल, किरीट सोमय्यांनी दिला थेट इशारा

Kirit Somaiya Attacks On Uddhav Thackeray : कागदपत्र सादर करत विविध घोटाळे उघडकीस आणण्याचा दावा करणारे भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहे. उद्धव ठाकरे यांच्या परिवाराच्या 19 बंगलो घोटाळा प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना ‘हिसाब तो देना पडेगा’ असे म्हणत सोमय्या यांनी थेट इशारा दिला आहे.

सोमय्या यांनी ट्विटमध्ये काय म्हंटले?
एफआयआर क्रमांक 26 नुसार, आयपीसी कलम 420, 465, 466, 468 आणि 34 प्रमाणे मुरुडच्या ग्राम विकास अधिकारी संगिता भांगरे यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. संगिता भांगरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्‍यांविरुद्ध फसवणूक, 19 बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे याबाबत तक्रार दाखल केल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

सोमय्यां यांच्या हिटलिस्टवर कोण कोण ?
किरीट सोमय्या यांनी 2023 च्या सुरुवातीलाच त्यांच्या निशाण्यावर कोण असणार आहे याची एक यादी जाहीर केली होती. त्याचवेळी त्यांनी ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, हसन मुश्रीफ आणि किशोरी पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा यांचा समावेश असल्याचे म्हटले होते.

नेमके काय आहे 19 बंगल्यांचे प्रकरण?
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे 9 एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी करण्यात आली आहे. ही जमीन आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्याकडून 2014 साली खरेदी केली आहे. या जागेत 19 बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करत होते. त्यांनी दरवर्षी (2009, 2010, 2011, 2012, 2013) नियमीतपणे ग्रामपंचायतीला घरपट्टी भरणा केली.

ठाकरे परिवाराने या 19 बंगल्यांसाठी 2013 ते 2021 या 8 वर्षांची घरपट्टी भरली. 11 नोव्हेंबर 2020 रोजी घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर ठाकरे सरकार, मुख्यमंत्री कार्यालयाने अलिबाग, रायगड जिल्ह्यातील शासकीय अधिकार्‍यांवर दबाव आणून या 19 बंगल्यांच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमधून काढून टाकल्या. रश्मी ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी. ज्याप्रमाणे अनिल परब यांच्या रिसॉर्टची चौकशी झाली आणि कारवाई करण्यात आली. तशीच कारवाई रश्मी ठाकरे यांच्या विरोधात करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube