Devendra Fadnavis : महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांना सन्माननीय जागा दिल्या जातील, असे म्हटलं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला केवळ 10 जागा दिल्या जाऊ शकतात. दरम्यान, जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप आपल्या मुलाच्या मतदारसंघात जाणीवपूर्वक अडचण तयार करतंय, भाजपने केसाने गळा कापू नये, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र डागलं. याला आता आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं.
Maidaan Trailer : प्रतीक्षा संपली! अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याविषयी फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, मी रामदास भाईंना इतक्या वर्षांपासून ओळखतो. अशी विधाने करायची त्यांना सवय आहे. त्यांना टोकाचं बोलायची सवय आहे. कधी कधी ते रागातही बोलतात. मात्र, भाजपने नेहमीच शिवसेनेचा आदर केला आहे. आमचे 115 आमदार असूनही आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचा आम्हाला आनंद आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्ही आमच्या मित्रपक्षांसोबत पुढे जात आहोत. अनेकवेळा लोक आमचं लक्ष वेधून घ्यायला आणि आपलं महत्व पटवून देण्यासाठी टोकाचं बोलतात. पण, आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्याकडे गांभीर्याने पाहायचं नसतं, असा टोला फडणवीसांनी लगावला.
Government Schemes : सोलर रुफटॉप सब्सिडी योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेतला?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळं महायुतीत जागावाटपावरून कुरबुरी वाढल्याचं दिसतं. शिंदे गटाएवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्या, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, कोणी कितीही मागणी केली तरी जागावाटपाचा निर्णय वास्तवावर आधारित असेल. मात्र, जागा वाटपावरून आमच्यात कोणतेही गंभीर मतभेद नाहीत. जागावाटप लवकरच पूर्ण करू, असे फडणवीस म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षांना सोबत घेऊनच आम्ही निवडणूक लढवू. मित्र पक्षांचा आम्ही आदरच करू, असं फडणवीस म्हणाले.
रामदास कदम काय म्हणाले?
महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून इथे जे काही चालले आहे ते अत्यंत घृणास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. पण जे तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका, असं कदम म्हणाले.