महायुतीच्या मेळाव्याला आमदार निलेश लंकेंची दांडी, मी येणार होतो पण…
Ahmednagar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections)अनुषंगाने नगर शहरात महायुतीचा महामेळावा (Mahayuti Mahamelava)पार पडला. या मेळाव्याला महायुतीचे अनेक नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते, मात्र या महामेळाव्याला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)हे अनुपस्थित होते. यावर आता त्यांनी भाष्य केले आहे. मेळाव्याचे निमंत्रण मला आले होते मात्र मी काही कारणास्तव बाहेर गावी असल्याने मेळाव्याला येऊ शकलो नाही, असे स्पष्टीकरण आमदार लंके यांनी दिले.
घटनादुरुस्ती नाकारली पण ‘त्या’ ठरावाला नार्वेकरांचीच हजेरी; ठाकरे गटाने पुराव्यात व्हिडिओच दाखवला
येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. नुकताच नगर शहरांमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला महायुतीचे सर्व मित्र पक्ष घटक हे सहभागी झाले होते.
Ira Khan: ‘त्या’ फोटोमुळं प्रचंड ट्रोल झाली आमिरची लाडकी लेक आयरा; नेटकरी म्हणाले…
अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके या मेळाव्याला गैरहजर होते. लंकेंच्या गैरहजेरीने राजकीय चर्चांना उधाण आले होते. विखे व लंके यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु असल्याने आमदार लंके यांनीच या कार्यक्रमाला दांडी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
यावर आमदार निलेश लंके यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, मला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडून निमंत्रण मिळाले होते मात्र काही कारणास्तव मी बाहेरगावी असल्याने या मेळाव्याला येऊ शकलो नाही, असे स्पष्टीकरण मेळाव्याच्या अनुपस्थितीबाबत लंके यांनी दिले.
लोकसभेवरुन रस्सीखेच :
येत्या काळात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. यातच नगर दक्षिणसाठी अनेक इच्छूक उमेदवार हे तयारीला लागले आहेत. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील नगर दक्षिणेतून आपण लोकसभा लढवणार, अशी जाहीर घोषणाच एका कार्यक्रमाद्वारे केली होती.
युतीचे सरकार असताना भाजपकडून खासदार विखे हे लढणार असल्याचे बोलले जात असतानाच लंके यांच्या पत्नी यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार अशी घोषणा केल्याने महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. लंके यांनी महायुतीच्या मेळाव्याला गैरहजेरी लावली असल्याचं देखील चर्चा रंगल्या होत्या.