नाशिकमध्ये भाजपची मेगाभरती; विरोधानंतरही ठाकरेसेना, मनसे, काँग्रेसचे पाच मातब्बर गळाला !

BJP: माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ, मनसेचे माजी आमदार नितीश भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Nashik Bjp

BJP's mega recruitment in Nashik; After the protest, five leaders of Thackeray's Sena, MNS and Congress

BJP: महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये (BJP) जोरदार इनकमिंग होत आहे. सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता नाशिकमध्ये भाजपने विरोधकांना जोरदार सुरुंग लावला आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत काँग्रेस, उबाठा आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. माजी महापौर, माजी आमदार असे मोठे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. (BJP’s mega recruitment in Nashik; After the protest, five leaders of Thackeray’s Sena, MNS and Congress)

ब्रेकिंग : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्या पांडेंची पक्षातून हकालपट्टी; वाघ यांनाही बाहेरचा रस्ता

नाशिकच्या भाजप कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ, मनसेचे माजी आमदार नितीश भोसले, स्थानिक नेते दिनकर पाटील, काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यांना प्रवेश देऊ नये, यासाठी आमदार फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्टही टाकली आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून् मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. जय श्री राम अशी पोस्ट आमदार देवयानी फरांदे यांनी केलीय. त्यानंतरही गिरीश महाजन यांनीही पाचही प्रवेश घडवून आणले आहे. या प्रवेशाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शविला आहे.

राम शिंदेंसाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी कायदाच बदलला; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

निष्ठावंतावर अन्याय होणार नाही, पण शंभर जागा-गिरीश महाजन
विशेष म्हणजे भाजपमध्ये घेतलेले हे स्थानिक नेतेही भाजपविरोधात जोरदार टीका करत होते. परंतु तरीही भाजपने या नेत्यांना प्रवेश केला आहे. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालायता आहे. निष्ठावंतावर अन्याय होणार नाही, असे गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे. नाशिक महानगरपालिकेत 122 जागा आहेत. त्यातील शंभर जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आणायचे असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी जाहीर केले.

Exit mobile version