Download App

नाशिक लोकसभेबाबत छगन भुजबळांचं मोठ विधान! म्हणाले, राष्ट्रवादीचा दावा आजही…

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेच्या जागेवर महायुतीमध्ये कोण उमेदवार असेल अशी मोठी चर्चा गेली अनेक दिवसांपासून रंगली होती. त्यानंतर येथून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ लोकसभा लढवतील अशी चर्चा सुरू झाली. मात्र, छगन भुजबळ यांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता ही जागा शिवसेनेकडेच जाईल अशी चर्चा आहे. परंतु, पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम आहे असा दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून पुन्हा एकाद महायुतीतील धुसफुस समोर आली आहे.

गोडसेंनी भुजबळांच्या हातातून नाशिक खेचून आणलं… त्याचीच ही गोष्ट

 

निर्णयावर आपण ठाम आहोत

नाशिकसाठी राष्ट्रवादीकडे खूप उमेदवार आहेत. त्यामध्ये काम करणारेही लोक अनेक आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम आहे अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. तसंच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडेही अनेक उमेदवार आहेत. हे लक्षात घेता पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबद निर्णय घेतील असंही भुजबळ म्हणाले आहेत. तसंच, लोकसभा निवडणुकीतून आपण माघार घेतली असून, त्या निर्णयावर आपण ठाम आहोत असं स्पष्टीकरणही भुजबळांनी यावेळी दिलं आहे.

‘नाशिक लोकसभा मतदारसंघ आमचाच’; हेमंत गोडसेंनी ठणकावूनच सांगितलं

 

ओबीसीमध्ये खुसखोरी होऊ देणार नाहीत

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मला आपण निवडणूक लढवा अशी विनंती करत आहेत. त्यांची वेळोवेळी समजूत काढली आहे. परंतु, मी माझ्या माघार घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, महायुतीकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार असेल तर त्यांनी आम्हाला लवकर गोड बातमी द्यावी असंही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत. यावेळी भुजबळ म्हणाले, मी आलो तर काही लोकांना भीती वाटते की मराठा समाज नाराज होईल. मात्र, मराठा स्वतंत्र आरक्षणाला विरोध नाही. परंतु, ओबीसीमध्ये खुसखोरी होऊ देणार नाहीत असंही भुजबळ यावेळी म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज