एक केस दाखवा अन् 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा; आरोपांवर CM शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर

Eknath Shinde : एक केस दाखवा अन् 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा, असं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या 50 खोक्यांच्या आरोपांवर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर भाजपकडून 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री […]

महायुती मुंबईत सर्वच जागा जिंकणार, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

महायुती मुंबईत सर्वच जागा जिंकणार, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Eknath Shinde : एक केस दाखवा अन् 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा, असं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या 50 खोक्यांच्या आरोपांवर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर भाजपकडून 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

चूक झाली म्हणता तर गुपचूप भेटून दहा-दहा वेळा निरोप का पाठवले? अमोल कोल्हेंचा खोचक सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही खोक्यांचा आरोप कोणावर करता आहात. जळगावातील शिवसेना नेते गुलाबराव पाटील, चंद्रकात पाटील, यांच्यासह इतर नेते आणि मी सर्वांनी शिवसेना मोठी केली आहे. शिवसेनेसाठी रक्ताचं पाणी केलं असून घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. जेल भोगलं केसेस घेतल्या तेव्हा तुम्ही कोठे होते? तुमच्यावर एकतरी केस दाखवा अन् 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा, असं खोचक प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

तुम्हाला खोके पुरत नाहीत तुम्हाला कंटनेर लागतात हे मी नाहीतर कोणतरी म्हणतं आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे. आज तुम्ही शिवेसना पक्षाचे 50 कोटी पत्र लिहुन मागत आहात. या एकनाथ शिंदेंनी विलंब न लावता यांना पैसेच पाहिजे ना तर देऊन टाका हे फक्त पैशांचे धनी असल्याचं म्हणत पैसे देऊन टाकले आहेत. आम्हाला संपत्ती नकोयं बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती हेच आमचं ऐश्वर्य असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत .

तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम का झालं नाही? कोल्हेंचा अजितदादांना बोचरा सवाल

सत्तेसाठी मोहापायी काय मिळवलं तुम्ही.आम्ही उठाव केला धाडस केलं. आज आरोप प्रत्योरोप करीत आहात. पण आरोपांना उत्तर आरोपाने नाहीतर कामातून उत्तर देणार असून दुसऱ्यांच्या खिशात हात घालणं हाच ठाकरेंचा उद्योग आहे. शेतकऱ्याच्या मुलाने कधी मुख्यमंत्री होऊ नये का? हेलिकॉप्टरने फिरु नये का? उद्या एक शेतकऱ्याचा मुलगा उद्या मुख्यमंत्री झाला तर सर्वात जास्त आनंद मला होईल, असंही जनतेला उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Exit mobile version