Download App

CM Eknath Shinde : सरकार पडेल म्हणणाऱ्यांचे ज्योतिषी संपले; अजित पवारच इकडं आले; शिंदेंचा टोला

Image Credit: letsupp

CM Eknath Shinde : आम्ही राज्याचं चांगलं होऊ दे यासाठी प्रार्थना करतो. मात्र विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात की, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाऊ द्या. अगोदर म्हणायचे सरकार पडेल सरकार पडेल. शेवटी त्यांचे ज्योतिषी संपले. अजित पवार ही सरकारमध्ये आले. त्यामुळे सरकार आणखी मजबूत झालं आहे. तसेच जनता जो पर्यंत सरकारच्या पाठीशी आहे. तो पर्यंत सरकारचा बाल बाका होऊ शकत नाही. असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

Karun Gelo Gaav: ‘करून गेलो गाव’ नाटकाच्या टीमकडून इर्शाळवाडीला मदतीचा हात!

अहमदनगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डी येथे पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोठे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात…

आम्ही राज्याचं चांगलं होऊ दे यासाठी प्रार्थना करतो. मात्र विरोधक रोज उठल्यावर प्रार्थना करतात की, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाऊ द्या. अगोदर म्हणायचे सरकार पडेल सरकार पडेल. शेवटी त्यांचे ज्योतिषी संपले. अजित पवार ही सरकारमध्ये आले. त्यामुळे सरकार आणखी मजबूत झालं आहे. तसेच जनता जो पर्यंत सरकारच्या पाठीशी आहे. तो पर्यंत सरकारचा बाल बाका होऊ शकत नाही.

मलिकांचं ठरलं तर! अजितदादांना धक्का देत शरद पवारांना दिलं बळ; म्हणाले, मी कुठेही…

तसेच पुढे मुख्यमंत्री म्हणाले, कीतीही स्वप्न पाहिली? दिवसा पाहा रात्री पाहा. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. एका शेतकऱ्याच्या पोराला आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या पोराला किती पाण्यात पाहाल? उठता बसता तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री दिसतात. जस इतिहासात संताजी धनाजी होते.

पण तुम्ही कितीही काहीही केलं तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. ही जनता आमच्या पाठीशी आहे. असंच हे वादळ वाढत राहणार आहे. कारण आता सरकार ट्रिपल इंजनचं झालं आहे. तर केंद्रात मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी स्वतःच हसं करून घेतल आहे. तर आता आपलं युपीए हे नाव बदलून त्यांनी इंडिया केलं आहे. मात्र ती इंडिया नाही. तर वेस्ट इंडिया आहे. यातील वेस्ट म्हणजे टाकावू. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंना आपल्या भाषणातून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज