मलिकांचं ठरलं तर! अजितदादांना धक्का देत शरद पवारांना दिलं बळ; म्हणाले, मी कुठेही…

मलिकांचं ठरलं तर! अजितदादांना धक्का देत शरद पवारांना दिलं बळ; म्हणाले, मी कुठेही…

Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकिय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. स्वतः शरद पवार यांनी मलिक यांना फोन केला होता. त्यामुळे मलिक कोणत्या गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर प्रतिक्रिया येत असतानाच आता खुद्द नवाब मलिक यांनीच भूमिका जाहीर करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? भुजबळांच्या उत्तराने वाढला सस्पेन्स

मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. नवाब मलिक यांच्या या वक्त्यव्यावरून हे स्पष्ट होत आहे की ते अजित पवार यांच्या गटात जाणार नाहीत. त्यांच्या भूमिकेवरून सध्या तरी तसेच संकेत मिळत आहेत.

मागील 18 महिन्यांच्या काळात माझ्या कुटुंबासह मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आजारी असल्यामुळे मलाही त्रास सहन करावा लागला. सध्याच्या परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून मी उपचार घेत आहे. पुढील महिन्यात माझी प्रकृती सामान्य होईल, असे अपेक्षित असल्याचे मलिक म्हणाले.

नवाब मलिक कोणत्या गटात? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

नवाब मलिक स्वतःच निर्णय घेतील – भुजबळ

नवाब मलिक कोणत्या गटात जातील असा प्रश्न काही दिवसांपूर्वी राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विचारला होता. आधी नवाब मलिक यांची प्रकृती तर बरी होऊ द्या. त्यानंतर कोणत्या गटात जायचं हे तेच ठरवतील. ते कुठेही गेले तरी फार लांब जाणार नाहीत. ते इकडेच राहतील असे भुजबळ म्हणाले.त्यांना मूत्रपिंडाचा मोठा आजार बळावला आहे. त्यामुळेच त्यांना दोन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. त्यांना आधी नीट तर होऊ द्या. ते बरे झाले तरच राजकारणात काम करू शकतील. त्यानंतर कुठे जायचं हे तेच ठरवतील. पण ते फार लांब कुठेही जाणार नाहीत ते इकडेच राहतील असेही भुजबळ म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube