‘मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे’; CM शिंदेंचा सणसणीत टोला…

Eknath Shinde On Thackeray Group : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चचक्री होत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्योरप तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही […]

'मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे'; मुख्यमंत्री शिंदेंचा सणसणीत टोला...

Eknath Shinde VS Udhav Thackeray Ram Mandir

Eknath Shinde On Thackeray Group : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चचक्री होत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्योरप तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला आहे. धर्मवीर 2 चित्रपट (Dharmveer 2 Movie) मुहूर्त सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

पुणे : भुजबळांना विरोध अन् गाडी फोडण्याचं खुलं चॅलेंज; स्वराज्य संघटनेचा शासकीय विश्रामगृहात राडा

मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोकं म्हणायचे मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिर बनवून दाखवलं असून तारीखही सांगून टाकली आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 22 जानेवारीला आम्ही सर्वजण अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनाला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

मराठ्यांनाच सर्वाधिक प्रतिनिधित्व; 5105 कोटीही वितरीत : आकडेवारी सांगत भुजबळांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं आहे. धर्मवीर आनंद दिघेंनी अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी पहिली चांदीची वीट त्याचवेळी दिली असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टोलेबाजी केली आहे. यावेळी इतर मुद्द्यांवरुनही मुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; नाशिक अन् बीडचे शिलेदार करणार देशाचे प्रतिनिधित्व

समृद्धी महामार्गाला आपल्याच लोकांची विघ्ने :
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्यानंतर मी नगरविकास मंत्री होतो. काम करीत असताना अनेकदा आपल्याच लोकांनी समृद्धी महामार्गाला विरोध केल्याचं मला दिसून आलं होतं. अनेक लोकांनी विघ्ने आणली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं की तुम्हालाच मैदानात उतरावं लागेल, मी माझ्या मतावर ठाम होतो, मैदानात उतरले आणि समृद्धी महामार्ग झाला, आज 15 तासांचं अंतर 7 तासांत आपण पार करतो, या महामार्गावर 50 लाख प्रवाशांनी प्रवास केला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.



धर्मवीरच्या पहिल्या भागातील सीन्स काहींना आवडले नाहीत :

धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागातील काही सीन्स काही लोकांना आवडले नाहीत, पण आता काहीही फरक पडत नाही. आपण फायनल अथॉरिटी आहोत. त्यासाठी छोटी, मोठी गोळी द्यावी लागते मी तर ऑपरेशन पण केलं असल्याची टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव घेता केली आहे. तसेच चित्रपटाच्या दुसऱ्या भागांत मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे. बंडानंतरची कहाणी त्यामध्ये दाखवण्यात येणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version