पुणे : भुजबळांना विरोध अन् गाडी फोडण्याचं खुलं चॅलेंज; स्वराज्य संघटनेचा शासकीय विश्रामगृहात राडा
पुणे : राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात संघर्ष सुरू आहे. यादरम्यान, स्वराज संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी शासकीय विश्रामगृहावर जाऊन छगन भुजबळ यांना थेट धमकीच दिली. भुजबळ साहेब, आमच्या आंदोलनाला नख लावण्याचा प्रयत्न करू नका जरा सबुरीन घ्या, वेळ पडली तर तुमची गाडी इथेही फोडू शकतो, असं इशारा त्यांनी दिला. त्यानंतर भुजबळ समर्थक चांगलेच आक्रमक झाले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि ओबीसी हक्कांसाठी भुजबळ आक्रमक भूमिका घेत आहेत. यापूर्वी त्यांनी जालन्यात आणि काल हिंगोली येथे ओबीसी एल्गार सभा घेतली. या सभांतून त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर आज पुण्यातील शासकीय विश्रामगृहावर छगन भुजबळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते येत आहेत. मात्र या बैठकीपूर्वी यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी भुजबळांच्या गाडीजवळ येऊन त्यांना चॅलेजं दिलं.
जाधव यांनी आपली कार छगन भुजबळ यांच्या गाडीशेजारी उभी केली आणि भुजबळांची कार फोडण्यासाठी वेळ लागणार नाही, असा असा इशाराही दिला. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी धनंजय जाधव यांना आत कसे सोडले? असा संतप्त सवाल ओबीसी अधिकाऱ्यांनी पोलिसांना केला. पोलिसांनी जाधव यांना गेटच्या बाहेर काढले. यावेळी ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झाले.
Animal Movie: हैदराबादमध्ये ‘अॅनिमल’च्या प्रमोशनदरम्यान ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी
दरम्यान, या इशाऱ्यानंतर ओबीसी समाजातील बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. भुजबळ हे आमचे दैवत आहेत. आमच्या दैवताला जर कोणी इशारा देत असेल तर त्यांना जशाच तसं उत्तर देऊ…. हे कायद्याचं राज्य आहे, गुडंगिरी आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका समर्थकांनी घेतली आहे. यावेळी छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भुजबळांची गाडी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा ओबीसी परिषदेने निषेधही केला.
काय म्हणाले धनंजय जाधव?
चिथावणी देऊन ओबीसी-मराठा संघर्षाला खतपाणी घातले जात आहे. भुजबळांना विनंती आहे की, आमच्या मुलांबाळांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या आड येऊन का. त्यांनी आमच्या आरक्षणाला नख लावू नये. अन्यथा परिणाम वाईट होतील. वेळ पडल्यास येथे छगन भुजबळ यांची गाडी इथेही फुटू शकते.