CM Shinde : दाऊद, छोटा शकील सगळे आले पण मी कधी धमकीला घाबरत नाही; शिंदेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. यावेळी त्यांनी नक्षल वाद्यांकडून धमकी आली. त्यावेळी आपली सिक्युरिटी काढू घेतल्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, दाऊद, छोटा शकील सगळे आले पण मी कधी धमकीला घाबरत नाही. शिंदे आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते. Jnanpith Award 2023 […]

CM Shinde : दाऊद, छोटा शकील सगळे आले पण मी कधी धमकीला घाबरत नाही; शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

CM Shinde

CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. यावेळी त्यांनी नक्षल वाद्यांकडून धमकी आली. त्यावेळी आपली सिक्युरिटी काढू घेतल्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, दाऊद, छोटा शकील सगळे आले पण मी कधी धमकीला घाबरत नाही. शिंदे आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते.

Jnanpith Award 2023 : प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहिर!

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, मी पाच वेळा त्यांना म्हणजे ठाकरेंना सांगितलं. की, आपण भाजप सोबत जाऊया. ते मला पाचव्या वेळेस म्हणाले पुढच्या अडीच वर्ष ते आपल्याला देतील का? म्हणजे पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रीपद आपल्यालाच हव होतं. पण या खुर्चीवर बसायचं त्याचे सगळे पाय तर मजबूत पाहिजे. मी कधी धमकीला घाबरत नाही माझ्या आयुष्यात खूप धमकी आल्या. दाऊद आला, छोटा शकील आला सगळे आले आणि येऊन गेले.

‘भाजपकडून ऑपरेशन लोट्स सुरु’ विश्वासदर्शक ठराव जिंकत केजरीवालांचा प्रहार

मला नक्षल वाद्यांकडून धमकी आली. त्यावेळेस मला झेड प्लस सिक्युरिटी बैठक झाली. पण त्यांनी आठ वाजता शंभूराजे यांना फोन केला आणि सांगितलं ती सिक्युरिटी देऊ नका. तुमच्या मनात होतं एकनाथ शिंदे यांची नक्षल्यांनी हत्या करावी. काट्याने काटा निघावा. मी तुमचा अडथळा नव्हतो तुमचा एड्सर कधीच नव्हतो. मला तुम्ही सांगितलं असतं. कोणाला पुढे न्यायचं तर मी मनमोकळा पणाने सगळं सोडल असतं. मी भोळा भाबडा आहे.

माझ्या खात्यात हस्तक्षेप होता. तुम्हा सगळ्यांना माहित आहे. मी देणारा आहे घेणारा नाही मी त्यांना बोललो तुम्हाला काय हवं? ते सांगा मी देतो.माझ्या घरावर हल्ला करायचा याची बैठक झाली. त्या बैठकीत असणारी काही लोक इथे बसलेले असतील. पण पुढे कोण जाणार? पण माझ्याकडे येन येड्या गबाळ्याचं काम नाही. माझ्याकडे मधमाशाचा पोळ आहे. असं शिंदे म्हणाले.

Exit mobile version