CM Shinde : माझा आवाज बंद करु नका, तो बंद होणार नाही; कारण माझ्या सोबत शिवसैनिक

CM Shinde : माझा आवाज बंद करु नका, तो बंद होणार नाही; कारण माझ्या सोबत शिवसैनिक

CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. त्यावेळी बोलताना अचानक मध्येच शिंदेंचा माईक बंद पडला असता त्यांनी टोला लागवला की, माझा आवाज असा बंद करु नका. तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत. शिंदे आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते.

‘पुष्पा 2’ रिलीज होण्यापूर्वीच तिसऱ्या भागाची घोषणा; अल्लू अर्जुनने स्वतःच केला खुलासा

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, शरद पवार ठाकरेंना म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा. हे मला ते सांगत होते. तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणवले यांना मोह झाला आहे. मी कधीच पदाला हापापलो नव्हतो. त्यांनी मला आधीच सांगितले असते. तर मी तसा माहोल तयार केला असता. ते दिसतात तसे इनोसंट नाहीत. त्यामागे अनेक चेहरे आहेत. एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग.

केवळ बाजारू विचारवंत, त्याची अनेक लफडी आम्हाला माहिती…; मिटकरींना थेट इशारा

याचवेळी भाषणादरम्यान अचानक मध्येच शिंदेंचा माईक बंद पडला. तेव्हा ते म्हणाले की, माझा आवाज असा बंद करु नका तसा तो बंद होणार नाही कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही. निलम ताई सांगतील. मविआसोबत दिल्लीला गेले होते. मोदींना भेटायला तेव्हा एकटेच गेले. केबिनमध्ये मोदींना भेटायला गेले आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आमच्यावर पन्नास खोक्यांची टीका करतात मात्र यांना खोके पुरत नाही तर कंटेनर लागतात याचा सर्वात मोठा साक्षीदार मी आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्ष जेव्हा आम्हाला मिळाले त्यावेळी आम्हाला ठाकरेंचं पत्र आलं की, शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी आम्हाला पाहिजे. ते आम्हाला द्यावेत. त्यावर मी क्षणाचाही विचार न करता म्हटलं की त्यांना बाळासाहेबांचे विचार नको पैसा हवा आहे. तो तातडीने देऊन टाका त्यामुळे आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही पन्नास खोके मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी काही वाटली पाहिजे होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube