Download App

Ashok Chavan : ‘मला वेगळा पर्याय शोधायचा; राजीनाम्यानंतर चव्हाणांच्या पोटातलं ओठावर आलंच…

Ashok Chavan News : प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, पण मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) खदखद बोलून दाखवली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र पाठवल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका मांडली आहे.

भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर, चित्रपटावरून पुण्यात राडा…

पुढे बोलताना ते म्हणाले, मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. आपली पुढील राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करणार आहे. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिला असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

..म्हणूनच काँग्रेसला रामराम

काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केलं आहे. काँग्रेसमध्ये असतानाही अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, असं मला वाटलं म्हणून मी राजीनामा दिला आहे. त्यामागे असं दुसरं कोणतं कारण नाही. मला पक्षांतर्गत गोष्टींची जाहीर वाच्यता करायची नाही. कोणत्याही प्रकारची जुनी उणी-धुणी मला काढायची नाही तो माझा स्वभावही नाही. मी अनेक वर्ष काम केलं आहे अत्ता दुसरा पर्याय शोधला पाहिजे म्हणूनच राजीनामा दिला असल्याचं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे.

भाजपमध्ये जाणार का?
मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांतच जाहीर करणार आहे. भाजपची कार्यप्रणाली मला माहित नाही, असं भाजपप्रवेशावर अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंची पत्नी होणार खासदार; सागरिका घोष यांना राज्यसभेचे तिकीट

मी काँग्रेसमध्ये जन्मापासून सक्रिय आहे, गेल्या 30 वर्षांपासून मी काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी अनेक प्रयत्न केली आहे. मलाही काँग्रेसने मोठं केलं आहे. यामध्ये शंका नाही पण काँग्रेसलाही मोठं करण्यासाठी अशोक चव्हाण मागे राहिलेले नाहीत, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघात झालेल्या चर्चेची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

follow us