भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर, चित्रपटावरून पुण्यात राडा…

भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर, चित्रपटावरून पुण्यात राडा…

Pune NFAI clashes : पुण्याच्या एनएफएआय (Pune NFAI clashes ) या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत प्रभास चंद्रा लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटावरून राडा झाला आहे. ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनेने राडा घातला आहे.

शिंदे, अजितदादांमुळे मला मतदार संघचं उरला नाही; पंकजा मुंडेंनी आळवला नाराजीचा सूर

समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या हिंदुत्ववादी संघटनेने या चित्रपटाची पोस्टर फाडत निदर्शनं केली. त्यानंतर पुण्याच्या डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घेतलं कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटर आयोजित सिनेमा ऑफ इंडिया या चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात येत होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीच हे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महोत्सवाची पोस्टर फाडत गोंधळ घातला. त्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आलं.

रिलीजच्या तिसऱ्या दिवशी दणक्यात आपटला ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, शाहीदचा सिनेमा डब्बागुल?

चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट प्रभासचंद्रा यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेला आहे चित्रपट कश्मीर मधील एका मुलीच्या आठवणींवर आधारित असणारी कथा आहे. या चित्रपटाचं पुण्याच्या एनएफएआय या प्रतिष्ठित चित्रपट संवर्धन संस्थेत प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. त्या दरम्यान समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या हिंदुत्ववादी संघटनेने या चित्रपटाची पोस्टर फाडत निदर्शनं केली. कारण या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या हिंदुत्ववादी संघटनेने केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज