Download App

‘दुसऱ्याचं घर पेटवायला निघाले होते, स्वत:चंच घर जळालं’ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची CM फडणवीसांवर टीका

Harshvardhan Sapkal Criticized Devendra Fadnavis Nagpur Violence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब यांच्यावर टीका करत असताना माझा शा‍ब्दिक तोल ढासाळलेला नाही. देवेंद्र फडणवीस साहेब औरंगजेब आहेत, त्यांनी तशीच वेशभूषा करावी, असं मी कधी म्हटलेलं नाही. असं कोणतंही विधान मी करणार नाही, अन् केलेलं देखील नाही असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) स्पष्ट केलंय. राज्यकारभारावर टीका करणं हा आमचा अधिकार आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागतोय. तर मग संतोष देशमुखांची हत्या क्रूरपण होते, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागत नाही. स्वारगेटमधील बलात्कार होतो, खासदार आणि केंद्रीय मंत्र्‍यांच्या लेकीला छेडलं जातं, कैलास नागरे नावाचा शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहोचत नाही. परंतु जेव्हा फडणवीसांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेला तडा जातो. भाजपकडून या प्रकारची राजकीय भाषा वापरली जाते, ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने आहे.

वाहनचालकांसाठी महत्त्वाचे! सावधान रहा, अन्यथा तुम्हाला 10 हजारांचा फटका बसलाच समजा…

काल एक खासदार म्हणाला की, नरेंद्र मोदी मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. त्यामुळे भाजपकडून असंही ऐकायला मिळू शकतं की, देवेंद्र फडणवीस मागच्या मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो, तेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेस पोहोचत नाही. या सरकारने महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षित व्हा, अशी योजना काढली का? असा देखील सवाल हर्षवर्धन सपकाळ (Congres) यांनी केलाय.

एवढा सत्तेचा अहंकार बरोबर नाही, अशी देखील टीका सपकाळ यांनी केलाय. नागपूर जळतंय सर्वांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे. सामाजिक तेढ निर्माण करणारे मंत्रिमंडळातील काही सदस्य करत आहेत. कोकण पेटवायला निघाले होते, परंतु नागपूरचं पेटलं. दुसऱ्याचं घर पेटवायला निघाले होते, स्वत:चंच घर जळालं याचा धडा देवेंद्र फडणवीसांनी घ्यावा, असं आवाहन देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय.

परबांना समज अन्, टांगा पलटीचा उल्लेख ; आक्रमक झालेल्या शिंदेंनी बाहेर काढला ठाकरेंचा माफीनामा

भगतसिंग राजगुरू यांसारख्या अनेकांना फाशी दिल्या गेली आहे. असं जे ढोंगी सरकार इंग्रजांचं होतं, त्या इंग्रजांना मदत करणारे, इंग्रजांचे हस्तक असणार आणि इंग्रजांकडून पेन्शन घेणारे, त्या क्रूर सरकारला मदत करणारे, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधात असणाऱ्यांच्या देखील काही कबरी, पुतळे समाध्या महाराष्ट्रामध्ये आहेत.

follow us