Download App

‘आम्हालाही आरेला कारे करता येतं पण..,’; शिवतारेंवरुन अजितदादा कडाडले

Ajit Pawar On Vijay Shivtare : आम्हालाही आरेला कारे करता येतं पण महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) उमेदवारीवरुन कडाडले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार आहेत. बारामतीमध्ये शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. अशातच आता शिंदे गटाचे विजय शिवतारेंनीही बारामतीतून कंबर कसली आहे. अशातच विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका-टिप्पणी केल्याने अजित पवार त्यांच्यावर चांगलेच कडाडल्याचं दिसून आले आहेत.

नाट्य परिषदेच्या नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न; मुंबईत होणार अंतिम सोहळा

अजित पवार म्हणाले, आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्हीही आरेला कारे करु शकतो पण मला महायुतीचं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण मी काही बोललो तर त्याचा विपर्यास केला जातो. आम्हाला निवडणूका पार पाडायचं आहेत वातावारणच चांगला ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणी कोणाची भेट घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जे आमच्यासोबत त्यांना घेऊन आम्ही सोबत घेऊन जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! ‘या’ कारणामुळे अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार

विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यामध्ये माणुसकी नसल्याचा आरोप केला आहे. त्यावर माध्यमांमधून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, कोणामध्ये माणुसकी आहे आणि नाही हे लोकं ठरवणार आहेत. विजय शिवतारेंबद्दल मला काहीही माहित नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे. आता नेतृत्वाचं ऐकायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते आणि बैठक घेऊन यावर मार्ग काढणार आहोत. जे प्रतिसाद देतील त्यांना सोबत घेऊन जाऊ जे देणार नाहीत त्यांच्याबाबत नेतृत्व निर्णय घेणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीदौऱ्यानंतर जागावाटप फायनल :
आगामी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र, अद्याप महायुतीचा जागावाटपाचा पेच सुटलेला दिसत नाही. त्यावर बोलताना पवार म्हणाले, दिल्ली दौरा झाला की जागावाटपांचा फायनल होणार आहे. 80 टक्के जागांबाबत निर्णय झाला असून 20 टक्के जागांचं बाकी एकदा बैठक झाल्यानंतर फायनल होणार असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत.

follow us