Download App

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या 36 आमदारांचं साकडं… एकच प्रतिप्रश्न विचारत पवारांनी जाहीर केला निर्णय

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाह 9 मंत्री आणि बंडखोर नेत्यांनी काल (16 जुलै) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी, पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री आणि आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली, असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी  भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. दरम्यान, आमदार, नेत्यांच्या या विनंतीवर पवारांनी एकच प्रश्न विचारत सर्वांना त्यांचा निर्णय सांगून टाकला. (DCM Ajit Pawar along with praful patel and ncp mla meet NCP chief Sharad Pawar)

बैठकीत नेमकं काय झालं?

बैठकीतील उपस्थित एका आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांनी या बैठकीचे नेतृत्व केलं. या तीन नेत्यांच्या नेतृत्वातच कालही सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर सर्व आमदार अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनीही शरद पवार यांना भेटायचं असल्याचं सांगितलं.

‘त्यांच्या मनातलं मी सांगू शकत नाही’; शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया

आज अधिवेशनाचा पहिला दिवस संपल्यानंतर सर्वच आमदारांना घेऊन अजित पवार यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले. काही वेळातच जयंत पाटील आणि अन्य नेते दाखल झाले. शरद पवार आल्यानंतर बैठक सुरु झाली. बैठकीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आमदारांची भाजपसोबत जाण्याची भावना असल्याचं पुन्हा एकदा शरद पवार यांना सांगितलं. त्यावर शरद पवार यांनी “आयुष्यभर मी यांच्या विरोधात लढलो आणि आता यांच्यासोबत कसं जाऊ?” असं म्हणतं अप्रत्यक्षपणे आपला निर्णयच जाहीर करुन टाकला.

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत टाचणी पडताच चर्चेत येणारं ‘यशंवतराव चव्हाण सेंटर’ काय आहे?

तर त्याचवेळी जयंत पाटील यांनी मात्र भाजपसोबत न जाण्याबाबत ठाम भूमिका व्यक्त केली. जयंत पाटील यांनी बंडखोरी केलेल्या सर्वच नेत्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. जे झालं ते बरोबर झालं नाही, अत्यंत घाई, गडबडीत आणि कोणताही पूर्वविचार न करता हा निर्णय घेतला असल्याचं जयंत पाटील यांनी नेत्यांना सांगितलं. तसंच महाविकास आघाडी न सोडण्याच्या आणि भाजपसोबत न जाण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचं स्पष्ट केलं.

Tags

follow us